घरताज्या घडामोडीऋतिकच्या मिस्ट्री गर्लचं सुझेन खाननं केलं कौतुक ? पाहा व्हायरल पोस्ट

ऋतिकच्या मिस्ट्री गर्लचं सुझेन खाननं केलं कौतुक ? पाहा व्हायरल पोस्ट

Subscribe

सुझेनने शेअर केलेल्या फोटोमध्ये सबा स्टेजवर परफॅार्म करताना दिसत आहे.  तिचा  परफॉर्मन्स  पाहून सुजैन  इतकी खूष झाली की, तिने सबावर कौतुकांचा वर्षाव केला.

ऋतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून आपल्या खास मैत्रिणी सोबत फिरताना दिसतोय. ऋतिकचं नाव अभिनेत्री सबा आजाद हिच्याशी जोडलं गेलय. अनेक वेळा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.  आता ऋतिकची पहिली पत्नी सुझेन खानने सबा विषयी कमेंट केली आहे. आता तुम्हाला वाटेल की सुझेने साबावर राग व्यक्त केला असेल पण असे नाहीये.
सुझेनने सबा आजादचं कौतुक करताना दिसत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सबाचा एक फोटो शेअर केला आहे. सध्या या फोटोची आणि सुझेनच्या कमेंटची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली आहे.
सुझेनने शेअर केलेल्या फोटोमध्ये सबा स्टेजवर परफॅार्म करताना दिसत आहे.  तिचा  परफॉर्मन्स  पाहून सुजैन  इतकी खूष झाली की, तिने सबावर कौतुकांचा वर्षाव केला. ‘काय कमाल संध्याकाळ होती. सबा तू खूपच सुपर कूल आणि प्रभावशाली आहेस’, असे म्हणत सुझेनने फोटो शेअर केला.

सबानं दिलं उत्तर

सबा आजादने सुद्धा सुजैन खानच्या कौतुकाचं उत्तर मोठ्या कमालीने दिले. तिने सुजैन खानच्या इंस्टा स्टोरीला रिपोस्ट करून तिचे आभार व्यक्त केले. सबाने लिहीले,’धन्यवाद सूजी, मी खूप खूश आहे कारण कालच्या कार्यक्रमाला तुम्ही तिथे उपस्थित होता’
ऋतिक आणि सुजैन हे एकमेकांपासून वेगळे झाले असले, तरीही ते आजही चांगले मित्र आहेत. दोघे मिळून त्यांच्या मुलांचा सांभाळ करतात. दोघेही एकमेकांच्या फोटो वर कमेंट सुद्धा करताना दिसून येतात.
ऋतिक रोशन काही दिवसांपूर्वी सबा सोबत डिनर डेटसाठी गेला असताना एका रेस्टॅारंट मधून बाहेर येताच कॅमेर्यात कैद झाला होता. सबा आजाद एक अभिनेत्री असून त्याबरोबरच ती एक संगीतकार सुद्धा आहे. तिने दिल कबड्डी, मुझसे फ्रेंडशिप करोगी, कनेक्टेड सारख्या बर्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -