घरताज्या घडामोडीYES BANK SCAM : येस बॅंक घोटाळा प्रकरणात CBI च्या मुंबई, पुण्यात...

YES BANK SCAM : येस बॅंक घोटाळा प्रकरणात CBI च्या मुंबई, पुण्यात सहा ठिकाणी धाडी

Subscribe

सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टिगेशन (CBI) ने Yes Bank scam प्रकरणात दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DFHL) च्या व्यवहार केलेल्या संबंधित लोकांच्या मालमत्तांच्या ठिकाणी मुंबई, पुण्यात छापे टाकले आहेत. एकुण सहा ठिकाणी छापेमारी झाल्याचे कळते. त्यामध्ये मुंबई आणि पुण्यात विविध ठिकाणी छापेमारी झाल्याचे कळते. त्यामध्ये बिल्डर संजय छाब्रियाच्या रेडियस ग्रुपच्या मालमत्तांच्या ठिकाणीही छापेमारी झाली आहे.

- Advertisement -

रेडियस ग्रुपने मुंबई उपनगरात रिअल इस्टेटच्या विकास प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरात डीएचएफएलच्या माध्यमातून ३ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. रेडियस आणि समर ग्रुपमध्ये संयुक्त भागिदारीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पण या प्रकरणात कर्जाचा वापर हा योग्य गोष्टीसाठी न झाल्याचे आढळले आहे. तर आणखी एका प्रकरणात ही रक्कम कुटूंबीयांच्या नावे वळवण्यात आल्याचे सीबीआयच्या तपासात निदर्शनास आले आहे.

डीएचएफएलचे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या केसेसमुळे सध्या कारागृहात आहेत. तर येस बॅंक घोटाळ्यातही राणा कपूरही तळोजा कारागृहात आहे. येस बॅंकेचा सहसंस्थापक असलेला राणा कपूर आणि त्याच्या कुटूंबीयांनी ६०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सीबीआयचा दावा आहे. DFHL च्या माध्यमातून ३७०० कोडटी रूपयांच्या हाऊसिंग फायनान्स प्रकरणातील हा घोटाळा आहे. सीबीआयने आतापर्यंत राणा आणि कुटूंबीयांवर दोन चार्जशीट दाखल केल्या आहेत. दिवाळखोरीतील DFHL ला कर्ज दिल्या प्रकरणी या चार्जशीट आहेत. या प्रकरणातील सुनावणी ही शनिवारी पार पडणार आहे. सीबीआयने केलेल्या दाव्यानुसार ७५० कोटी रूपये हे ज्या उद्देशासाठी कर्ज घेण्यात आले, त्यासाठी वापरण्यात आले नाही. सीबीआयने पहिली चार्जशीट ही जून २०१८ मध्ये दाखल केली आहे. वांद्रे रिक्लेमेशन प्रकल्पात ७५० कोटी रूपयांचे कर्ज बिलीफ रिअलेटर्सला मंजूर करण्यात आले होते. ही रक्कम आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना देण्यात आली. पण या प्रकरणात धीरज वाधवान यांना प्रस्तावात अनेक शंका असतानाही कर्ज मंजूर करण्यात आले होते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -