‘फायटर’ चित्रपटासाठी ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण घेणार मार्शल आर्टचे ट्रेनिंग

'विक्रम वेधा'चे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ऋतिक रोशन अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत आगामी 'फायटर' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनने गेल्या आठवड्याच त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन अभिनेता सैफ अली खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान आता ‘विक्रम वेधा’चे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ऋतिक रोशन अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत आगामी ‘फायटर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. ‘फायटर’ चित्रपटाच्या माध्यमातून ऋतिक आणि दीपिका पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ऋतिक रोशन या चित्रपटामध्ये ऍक्शन मोडमध्ये दिसून येईल तसेच यासाठी त्याने मार्शल आर्टची ट्रेनिंग सुद्धा सुरू केली आहे. चित्रपटातील भूमिकेत एकदम परफेक्ट बसण्यासाठी ऋतिकने जोरदार तयारी चालू केली आहे. पुढील महिन्या पर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ऋतिकला मसल्स कमी करण्यासाठी मार्शल आर्ट्सच्या अनेक फॉर्म्सची ट्रेनिंग सुद्धा घ्यावी लागणार आहे. याशिवाय या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा लवकरच ‘फायटर’च्या चित्रीकरणासाठी सुरूवात करणार आहे. ‘फायट’र चित्रपटाला भारतातली पहिला ऍक्शन चित्रपट असल्याचे म्हणटले जात आहे. ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ नंतर ऋतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंदचा हा तिसरा चित्रपट आहे. ‘फायटर’ पुढच्या वर्षीच्या ऑक्टोंबर पर्यंत रिलीज होणार आहे.

 


हेही वाचा :ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या सिद्धांत कपूरला जामीन