घरमनोरंजन'मैत्रिणींनो खरं बोला, #Metooचा गैरफायदा नको'

‘मैत्रिणींनो खरं बोला, #Metooचा गैरफायदा नको’

Subscribe

सध्या बॉलीवूडमध्ये #Meetoo मुव्हमेंटची लाट पसरली आहे. तनुश्री दत्तापाठोपाठ आता कंगना रनावत, विंटा नंदा, ज्वाला कट्टा आणि संध्या मृदूल या अभिनेत्रींनीही पुढे येत त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाची वाच्यता केली आहे. मात्र, एकीकडे बॉलीवूडमधून Metoo चळवळीला पाठिंबा मिळत असताना, दुसरीकडे बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांनी अभिनेत्रींना एक वेगळंच आवाहन केलं आहे. हुमा कुरेशीने तिच्या ट्वीटर अकाउंटवरुन #Metoo मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे पण त्याचसोबत #MeToo चा गैरफायदा घेऊ नका असं आवाहनही केलं आहे. ‘माझ्या बहिणींनो  या मुद्द्यावरुन कुणावरही विनाकरण आरोप करु नका‘ अशा अर्थाचं ट्वीट सोना मोहपात्राने केलं आहे. सोनाच्या या ट्वीटला तिच्या चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर, आता अन्य अभिनेत्रींनीही या प्रकरणात पुढे येऊन आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

अभिनेत्री संध्या मृदूल हिने नुकताच अभिनेते अलोक नाथ यांच्याविरुध्द लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. नुकताच निर्मीती-लेखिका विंटा नंदा यांनी नुकताच ‘सोज्वळ’ भूमिका साकारणाऱ्या आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र, हुमा खुरेशी यांनी केलेल्या या ट्वीटमुळे आता #MeToo मोहिमेला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. ‘मीटू मुव्हमेंटचा वापर करुन तुम्ही तुमच्यावर झालेल्या अत्याचाराला जरूर वाचा फोडा. मात्र, याचा गैरफायदा घेऊन उगाचच कोणावर आरोप करु नका. मीटू मुव्हमेंटला कोणीही कृपया बदनाम करु नका‘ असं आवाहन हुमाने चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना केलं आहे.


वाचा: #MeToo चळवळीचा संपूर्ण इतिहास, कशी झाली याची सुरुवात


आजच्या तारखेला संपूर्ण देशात हे MeToo चळवळीचे लोण पसरते आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने, भारतात सर्वप्रथम MeToo हा हॅशटॅग वापरला आणि तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा अनुभव शेअर केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -