घरफिचर्स#MeToo चळवळ: काय आहे इतिहास, कशी झाली सुरुवात

#MeToo चळवळ: काय आहे इतिहास, कशी झाली सुरुवात

Subscribe

हॉलीवूड अभिनेत्रीने या चळवळीची सुरुवात करण्यापूर्वी, अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या तराना बर्के यांनी #MeToo ची सुरुवात केली होती.

अभिनेत्रा तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वीच अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद चिघळतो आहे. तनुश्री पाठोपाठ आता बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत आणि लेखिका-निर्मीती विंटा नंदा यांनीही #MeToo चळवळीला पाठिंबा देत, आपलं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. कंगना रनौत हिने निर्माता-दिग्दर्शक विकास बेहेल याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. तर मालिकांची निर्माती आणि लेखिका विंटा नंदा हिने ‘सोज्वळ’ भूमिका साकारणारे अभिनेते- आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या सगळ्या आरोपांनतर आता पुन्हा एकदा ‘Me Too’ चळवळीने जोर पकडला आहे. पुन्हा एकदा #MeToo हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? की बॉलीवूडमध्ये सध्या जोर पकडत असलेली  ही Metoo चळवळ जगासाठी नवीन नाही. भारतात आणि बॉलीवूडमध्ये येण्याआधीपासूनच जगात ही MeToo चळवळ सुरू आहे. जाणून घेऊया या चळवळीचा नेमका उदय कधी आणि कुठे झाला? याविषयीची सविस्तर माहिती.

हॉलीवूडमध्ये झाला उदय

लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या MeToo मुव्हमेंटचा उदय हॉलीवूडमध्ये झाला होता. प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने, सिनेनिर्माता हार्वे विंस्टिनने आपल्यावर बलात्कार केला आहे असा आरोप करत त्याविषयी ट्वीट केले होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये तिने ट्वीटरवरुन हा आरोप करतेवेळी ‘माझ्या ट्वीटला MeToo ने रिप्लाय करा’ असे जगभारातील लोकांना सांगितले होते. त्यानंतर संपूर्ण जगात हा MeToo हॅशटॅग व्हायरल झाला आणि पुढे जाऊन त्याचे कॅम्पेनमध्ये रूपांतर झाले. हा हॅशटॅग वापरुन सिनेजगतातील अनेक अभिनेत्री समोर आल्या आणि त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविषयी उघडपणे बोलू लागल्या. हॉलीवूडमधील अँजेलिना जॉली, अमेरिका फरेरा, लेडी गागा अशा अनेक महिलांनी या चळवळीला सपोर्ट दाखवत, आपल्यावर झालेल्या अत्याचाराविषयी भाष्य केले. अभिनेत्रींचा यातील सहभाग पुढे इतका वाढत गेला की ही एक जागतिक स्तरावरची मोहिम/चळवळ बनली.
मात्र, एलिसा मिलानोच्या आधीच २००६ साली अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या तराना बर्के यांनी #MeToo ची सुरुवात केली होती. तराना यांनी वंचित समाजातील लैंगिक शोषण झालेल्या महिलांसाठी Empowrment Through Empathy या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी MeToo नावाची एक डॉक्युमेंट्री तयार केली होती. तेव्हाच खऱ्या अर्थाने MeToo मुव्हमेंटला सुरुवात झाली होती.

- Advertisement -

भारतातही #MeTooचं वाढतं प्रमाण

आजच्या घडीला बॉलीवूड तसंच टॉलीवूडमध्येही MeToo चळवळ पसरते आहे. त्यामुळे संपूर्ण देशात हे MeToo चळवळीचे लोण पसरते आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने, भारतात सर्वप्रथम MeToo हा हॅशटॅग वापरला आणि तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा अनुभव शेअर केला. त्यांनतर रिचा चढ्ढा, कोंकणा सेन शर्मा, राधिका आपटे, इशिता दत्ता, मलिका दुआ, कंगना रनौत आणि आता तनुश्री दत्ता अशा अनेक अभिनेत्रींनी MeToo चळवळीला सपोर्ट केला आहे. तर दुसरीकडे श्री रेड्डी, पार्वती, सजिता मदातिल अशा दाक्षिणात्य अभिनेत्रींनीही MeToo चळवळीला सपोर्ट केला आहे.

दरम्यान #MeToo चळवळीमुळे आजवर मुकाटपणे अत्याचार सहन करणाऱ्या महिलांना आणि विशेषत: अभिनेत्रींना हक्काचं व्यासपीठ मिळाल्याचं मत, काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -