घरमनोरंजनINDvsPAK: थेट मैदानात उतरून रणवीरने केली अशी कॉमेंट्री

INDvsPAK: थेट मैदानात उतरून रणवीरने केली अशी कॉमेंट्री

Subscribe

विश्वचषक २०१९ चा सर्वात रोमांचकारी भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना रविवारी मॅनचेस्टर येथे मोठ्या जोशात पार पडला. या झालेल्या विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाक सामनाच्या लढतीत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.

या सामन्यामध्ये भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार मॅनचेस्टर दाखल झाले होते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, सैफ अली खान आणि आलियासह बरेच कलाकार तेथील मैदानावर उपस्थित होते.

- Advertisement -

क्रिकेटच्या मैदानापासून ते कॉमेंट्री बॉक्सपर्यंत कॉमेंटेटरची भूमिका

यापैकी अभिनेता रणवीर सिंग स्टेडिअममध्ये सर्वात जास्त उत्साहात दिसत होता. त्याने क्रिकेटच्या मैदानापासून ते कॉमेंट्री बॉक्सपर्यंत सामन्या दरम्यान कॉमेंटेटरची भूमिका निभावली. यावेळी रणवीरने सामना सुरू होण्यापुर्वी रणवीर एकदम प्रोफेशल कॉमेंटेटरप्रमाणे क्रिकेट चाहत्यांना माहिती देताना दिसला.

- Advertisement -

क्रिकेटर्ससोबत धम्माल करताना दिसला रणवीर

रणवीर सिंग १९८३ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत विजयी झाला होता. त्यावर आधारित चित्रपट ‘८३’ मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे चाहते त्याला या चित्रपटात बघण्यास तेवढेच उत्सुक आहेत.

पतीला प्रोत्साहन देण्यास पोहचली अनुष्का

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -