घरमनोरंजन'गल्फ सिने फेस्ट २०२१' च्या लोगोचे महेश कोठारेंच्या हस्ते उद्घाटन

‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ च्या लोगोचे महेश कोठारेंच्या हस्ते उद्घाटन

Subscribe

२० ते २३ जानेवारी २०२१ या दरम्यान दुबईमध्ये 'गल्फ सिने फेस्ट २०२१'चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारका सहभागी होणार आहेत. देश-विदेशातील मान्यवर पाहुणे या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

सातासमुद्रापलिकडे पार परडणाऱ्या गल्फ सिने फेस्ट २०२१साठी मराठी सिनेसृष्टी सज्ज झाली आहे. कोरोनाच्या काळात सिनेसृष्टीला मोठी झळ बसली. कोरोना आणि लॉकडाऊन नंतर नव्या जोमाने आणि उत्साहाने मराठीची पताका सातासमुद्रापार फडकवण्यासाठी मराठी सिनेसृष्टी सज्ज झाल्याचे पहायला मिळत आहे. दुबईत रंगणारा गल्फ सिने फेस्ट २०२१च्या लोगेचे डिझायनिंग करण्यात आले आहे. या लोगोचे उद्धाटनही करण्यात आले आहे.

मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते गल्फ सिने फेस्ट २०२१च्या लोगोचे उद्घाटन करण्यात आले. नवीन वर्षांची सुरूवात काही नव्या शैलीत व्हावी या उद्देशाने दुबईमध्ये ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’चे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ जानेवारी २०२१ या दरम्यान दुबईमध्ये ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारका सहभागी होणार आहेत. देश-विदेशातील मान्यवर पाहुणे या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाच्या लोगेचे उद्घाटन निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ हे मराठी सिनेसृष्टीसाठी सकारात्मक पाऊल असून, २०२१ वर्ष मराठी सिनेमांसाठी उत्साहवर्धक ठरेल’, अशी आशा महेश कोठारे यांनी व्यक्त केली. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’च्या संपूर्ण टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

दुबईत रंगणाऱ्या गल्फ सिने फेस्टचे आयोजन ५जी इंटरनॅशलच्या वतीने करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमांचे प्रीमियर शो दाखवले जाणार आहेत. त्याचबरोबर काही मराठी सिनेमांच्या ट्रेलर्स, प्रोमोज आणि गाण्यांची झलकही गल्फ सिने फेस्टिव्हलमध्ये पहायला मिळणार आहे.


हेही वाचा – मराठीतील नव्या चित्तथरारक वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -