घरताज्या घडामोडीIndependence Day 2021: राज कुंद्राच्या अटकेनंतर पुन्हा एकदा शिल्पा झाली व्यक्त

Independence Day 2021: राज कुंद्राच्या अटकेनंतर पुन्हा एकदा शिल्पा झाली व्यक्त

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या अटकेनंतर चांगलीच चर्चेत असते. जेव्हा राज कुंद्रा पॉर्न फिल्मप्रकरणात अटक केली आहे, तेव्हापासून शिल्पावर सगळ्यांचीच नजर आहे. आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसानिमित्ताने देश एकच जल्लोष करत आहे. सोशल मीडियावर ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पोस्टचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने शिल्पा शेट्टीने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

शिल्पा शेट्टीने ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने असे लिहिले आहे की, ‘जगातील सर्व माझ्या भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा.’ या पोस्टमध्ये शिल्पाच्या चाहत्यांनी तिला देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शिल्पाने पती राज कुंद्राच्या अटकेनंतर आपला विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसोबत शेअर केला होता. ज्यामध्ये शिल्पाने लिहिले होते की, ‘गेले काही दिवस प्रत्येक दिवस आव्हानात्मक होते. खूप साऱ्या अफवा आणि आरोप लावले गेले. यासोबत मला आणि माझ्या कुटुंबियांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे मी फक्त एवढंच म्हणणे की, मुंबई पोलीस आणि भारतीय न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कायद्याचे पालन करणारी भारतीय नागरिक आहे. गेल्या २९ वर्षांपासून मेहनती व्यावसायिक आहे. माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे आणि मी केव्हाच कोणाला निराश केले नाही आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यावेळी माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या हक्काचा आदर करावा, अशी मी तुम्हाला विनंती करते.’


हेही वाचा – ‘Super Dancer 4’ मधून शिल्पा शेट्टीला कायमचा डच्चू? जॅकी श्रॉफ- संगीता बिजलानी सेलिब्रिटी पाहुणे बनून येणार


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -