घरमनोरंजन'Super Dancer 4' मधून शिल्पा शेट्टीला कायमचा डच्चू? जॅकी श्रॉफ- संगीता बिजलानी...

‘Super Dancer 4’ मधून शिल्पा शेट्टीला कायमचा डच्चू? जॅकी श्रॉफ- संगीता बिजलानी सेलिब्रिटी पाहुणे बनून येणार

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी टीव्हीवरील लोकप्रिय डान्स शो सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. मात्र पती राज कुंद्राच्या अटकेनंतर काही दिवसांपासून शोमधून शिल्पा शेट्टी गायब आहे. पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. यामुळे तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र या वीकेंड एपिसोडमध्ये शिल्पाची जागा कोणाला बसवणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यातच शिल्पा शेट्टी पून्हा शोमध्ये परतणार असल्याचा चर्चा सुरु होत्या. पण या शोमधून एक नवीनच माहिती समोर येतेय. या वीकेंड एपिसोड शोमध्येही शिल्पा शेट्टी परतणार नाही. त्यामुळे आत्ता ‘Super Dancer 4’ मधून शिल्पा शेट्टीला कायमचा डच्चू दिला की काय अशा चर्चांना उधाण आले आहे. या वीकेंड एपिसोडमध्ये शिल्पा शेट्टीच्या जागी अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री संगीता बिजलानी पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत.

माध्यमांच्या माहितीनुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुढील काही आठवड्यातही शोमध्ये दिसणार नाही. शिल्पाच्या गैरहजेरीत शोमध्ये दर आठवड्याला सेलेब्स गेस्ट्स बनून येत आहेत. यात अपकमिंग एपिसोडमध्ये जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानी गेस्ट म्हणून दिसतील. यात शोमध्ये जॅकी श्रॉफ धमाल उडवून देत‘गजरा ने किया है इशारा, घड़ी भर का है खेल सारा’आणि ‘गली गली में फिरता है’ या जुन्या गाण्यावर परफॉर्मन्स करणार आहे. त्यामुळे संगीता बिजलानी आणि जॅकी श्रॉफची जोडी प्रेक्षकांना इतपत आवडते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

सुपर डान्सर ४ मधील स्पर्धकांनी आपल्या दमदार परफॉर्मन्सच्या जोरावर परिक्षकांसह प्रेक्षकांचीही मने जिंकली. दर आठवड्याला जबरदस्त आणि हटके परफॉर्मन्स देत स्पर्धक प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध होतायत. गेल्या आठवड्यात रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा या शोमध्ये गेस्ट कलाकार म्हणून दिसले होते. तर अभिनेत्री करिश्मा कपूरसुद्धा या शोमध्ये झळकळी होती. या बॉलिवूड सेलिब्रिटी पाहुण्यांकडूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होतेय.


मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे ‘कोण होणार करोडपती’च्या स्वातंत्र्य दिन विशेष भागाचे पाहुणे


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -