घरताज्या घडामोडीIRCTC Q3 Result : IRCTC मालामाल ! डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दुप्पट नफा

IRCTC Q3 Result : IRCTC मालामाल ! डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दुप्पट नफा

Subscribe

भारतीय रेल्वेची कॅटरींग आणि पर्याटन शाखा आयआरसीटीसीने डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निव्वळ नफ्यात १६६ टक्के वाढ नोंदवून २०८ कोटी रुपयांची वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षातील याच कालावधीत ७८ कोटी इतका नफा झाला होता. मागील वर्षातील जुलै ते सप्टेंबर अशा तीन महिन्यांच्या कालावधीत १५८ कोटी रूपयांच्या नेट प्रॉफिटच्या तुलनेत ३२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

डिसेंबर महिन्याच्या तिमाहीत मिळणार महसूल १४१ टक्क्यांनी वाढून ५४० कोटी रूपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षात २२४ कोटी रूपये इतका होता. कंपनीच्या बोर्डाने निकाल जाहीर करताना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर २ रूपये अंतरिम लाभही जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

कॅटरिंग सेवेतून मिळणारा महसूल ११७ टक्क्यांनी वाढला

आयआरसीटीसीचे शेअर्स आज मंगळवार एनएसईवर ०.३८ टक्क्यांच्या आकडेवारीनुसार ८३८.७५ रूपयांवर बंद झाले. या तिमाहित कंपनीचा EBITDA १९५ टक्क्यांनी वाढून २७९ कोटी इतका झाला आहे. कॅटरिंग सेवेतून मिळणारा महसूल ११७ टक्क्यांनी वाढून १०४ कोटी झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा महसूल जास्त आहे.

पर्यटन क्षेत्रातही चांगली कामगिरी

पर्यटन क्षेत्रातही कंपनीचा महसूल ३५३ टक्क्यांनी वाढून ६८ कोटी रूपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहित केवळ १५ कोटी रूपये होता. याचदरम्यान सार्वजनिक कंपनीचे इतर उत्पन्न डिसेंबरच्या तिमाहीत १६ कोटींवर घसरले आहे. मागील वर्षातील याच कालावधीत २१ कोटी रूपये इतके होते.

- Advertisement -

हेही वाचा : IPL Mega Auction 2022: आयपीएल २०२२ च्या लिलावातून ऑलराऊंडर बेन स्टोक्स आऊट, भविष्याचा प्लॅन काय?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -