घरमनोरंजनजॅकलीन तोंड लपवत का फिरली?

जॅकलीन तोंड लपवत का फिरली?

Subscribe

जॅकलीन फर्नांडिसचा तोंड लपवण्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमागचं रहस्य आता उलगडलं आहे.

सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जॅकलीन गुलाबी रंगाच्या ओढणीमध्ये तोंड लपवताना दिसत आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी वेगवेगळे तर्क-वितर्क लावले आहेत. हा फोटो पाहून अनेकांच्या मनात जॅकलीन तोंड लपवतल का फिरली? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामागील कारण आता समोर आले आहे. गर्दीमध्ये कुणी आपल्याला ओळखू नये म्हणून जॅकलीनने तोंडाला ओढणी लावल्याचे समोर आले आहे. या लपावाछपवीत आपल्याला खरच कुणी ओळखणार नाही, असे जॅकलीन वाटले. मात्र, कॅमेराने जॅकलीनला बरोबर कैद केले. त्यामुळे जॅकलीनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे नेमकं कारण?

इन्स्टाग्रामवर ‘विरल भयानी’ या युजरने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय या फोटो मागची सत्य बाजू देखील सांगितली आहे. जॅकलीन एका मोठ्या दुर्घटनेतून वाचली आहे. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकलीनची व्हिआयपी बोट पलटली. सुदैवाने जॅकलीन त्यातून वाचली. ही बोट पलटल्यामुळे जॅकलीनला पब्लिक बोटने प्रवास करावा लागला. या बोटीत कुणी आपल्याला ओळखू नये, अशी इच्छा जॅकलीनची होती. त्यामुळे जॅकलीन ओढणीच्या सहाय्याने आपला चेहरा लपवत होती. मात्र, हवेमुळे तिचा चेहरा दिसला. ती वर्सोवा बीचवर आल्यावर ओढणीने तोंड लपवत बाहेर आली आणि आपल्या गाडीत बसली.

- Advertisement -


हेही वाचा  – विजेंदरची विजयाची परंपरा कायम; सलग अकरावा विजय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -