घरमनोरंजनPosterOut : सामान्य मुलीची असामान्य गोष्ट; 'गुंजन सक्सेना' चित्रपटाचे पोस्टर लाँच!

PosterOut : सामान्य मुलीची असामान्य गोष्ट; ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटाचे पोस्टर लाँच!

Subscribe

१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे पोस्टर आणि संबंधीत एक व्हिडिओ शेअर केला आहे. गुंजर सक्सेना असे या चित्रपटाचे नाव असून अभिनेत्री जान्हवी कपूर गुंजन यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटगृह देखील बंद आहेत. तेव्हा हा आगामी चित्रपटदेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. गुंजन सक्सेना हा चित्रपट नेटफ्लिक्स दाखवला जाणार असून अद्याप त्याच्या तारखेची घोषणा झालेली नाही.

- Advertisement -

जान्हवीने घेतली मेहनत 

१९९९ साली कारगिल युद्धात गुंजन यांचे योगदान आहे. त्यांनी जिवाची पर्वा न करता आपल्या साथीदारांचे प्राण वाचवले होते. गुंजन यांना त्यांच्या शौर्यासाठी सूर्यवीर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या या कामगिरीला उजाळा देणारा हा सिनेमा असणार आहे. हा चित्रपट भारतीय हवाई दलातील पहिली महिला चॉपर पायलट गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित आहे. जान्हवीने त्यांचा एअर फोर्सचा हाच निळा डगला परिधान केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धर्मा प्रोडक्शनचा हा सिनेमा असून हा चित्रपटही आता डिजीटल माध्यमातून प्रदर्शिक केला जाणार नाही. जान्हवीने हा रोल अधिक चांगला करण्यासाठी गुंजन यांची भेट घेतली आहे. तसेच तिने विमान उडवण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनाचे साईड इफेक्ट्स : पेट्रोल सलग तिसऱ्या दिवशी महागलं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -