घरमनोरंजन'गुहागरमधील बालपणाचा अभिनयासाठी उपयोग झाला'

‘गुहागरमधील बालपणाचा अभिनयासाठी उपयोग झाला’

Subscribe

गुहागरमध्ये बालपणी अनेक व्यक्ती आणि वल्ली भेटल्या. त्याचा उपयोग भूमिका साकारताना झाला. आज जे पुरस्कार, मानसन्मान मिळत आहेत, त्याचे श्रेय गुहागरातील बालपणात आहे. बालपणीचे अनुभव आणि संस्कारांचा रंगभूमीवरील यशात मोठा वाटा आहे, असे उद्गार मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार जयंत सावरकर यांनी काढले.

कोपरी नारायण देवस्थाननेया सत्कारप्रसंगी ते बोलत होते. गुहागर वरचापाट येथील कोपरी नारायण मंदिरात कार्तिकोत्सवानिमित्त ‘वाजे पाऊल आपुले’ या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग झाला. मुंबई मराठी साहित्य संघाचे उपाध्यक्ष जयंत सावरकर यांनी या नाटकाची पुनर्निर्मिती केली आहे. या नाट्यप्रयोगासाठी जयंत सावरकर गुहागरला आले होते. नुकताच महाराष्ट्र शासनाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. त्याबद्दल कोपरी नारायण देवस्थानने गुहागर तालुक्यातील नाटकप्रेमी मंडळींतर्फे जयंत सावरकर यांचा सत्कार केला. सावरकरांचे शाळेतील सवंगडी मधुकर दीक्षित आणि अरविंद दीक्षित यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी सावरकर म्हणाले की, अंतू बर्व्याची भूमिका लोकप्रिय झाली, तेव्हा पु. ल. मला भेटले. अंतू बर्वा हुबेहुब साकारता, असे म्हणत कौतुक करत होते. तेव्हा त्यांना मी म्हटले, असे अनेक अंतू बर्वे बघत लहानाचा मोठा झालो. कोकणातील प्रत्येक गावात अन प्रत्येक घरात एक तरी अंतू हमखास असतो. हे मी जिथे जाईन तिथे सांगायला अभिमान वाटतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -