कमल हासनच्या ‘Vikram’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमावले 200 करोड

या चित्रपटाला आईएमडीबी 2022 ची सर्वात जास्त बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीमध्ये टॉप पोजिशन मिळालेली आहे.

लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘विक्रम’ चित्रपट लवकरच येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तमिळ सुपरस्टार कमल हासन, विजय सेतुपति आणि फहाद फासिल हे मुख्य भूमिकेत असून प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक हा चित्रपट येत्या 3 जून रोजी प्रदर्शित करणार आहेत. मात्र नुकतीच या चित्रपटाबाबत एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

विक्रम चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमावले 200 करोड

सूत्रांच्या माहितीनुसार, कमल हासन, विजय सेतुपति आणि फहाद फासिल यांच्या सारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेला विक्रम चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 200 करोड रूपये कमावले आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार या चित्रपटाने मोठी रक्कम डिजिडल आणि सेटेलाइट राइट्स विकून मिळवलेले आहेत. सूत्रांच्या मते, अभिनेता कमल हासनच्या या येत्या चित्रपटाने चित्रपटाचा प्री-रिलीज बिजनेस सुद्धा खूप चांगला झाला आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई नक्कीच करू शकतो.

आईएमडीबी रेटिंगमध्ये नंबर 1 रॉकिंग मिळवला
या चित्रपटाबाबत आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, या चित्रपटाला आईएमडीबी 2022 ची सर्वात जास्त बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीमध्ये टॉप पोजिशन मिळालेली आहे. शिवाय या चित्रपटानंतर दुसऱ्या क्रमाकांवर मेजर चित्रपट आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज चित्रपट आहे. अशातच आता कमल हासनचा ‘विक्रम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

 


हेही वाचा :‘Samrat Prithviraj’पासून ‘Jug Jugg Jeeyo’पर्यंत जून महिन्यात रिलीज होणार ‘हे’ 7 चित्रपट