घरमनोरंजनदुसऱ्या मुलाच्या नावाला विरोध झाल्यानंतर करिनाने तोडले मौन म्हणाली...

दुसऱ्या मुलाच्या नावाला विरोध झाल्यानंतर करिनाने तोडले मौन म्हणाली…

Subscribe

करिना आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर असं ठेवलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan)नेहमीच चर्चेच्या झोतात असते. तिच्या चित्रपटा व्यतीरिक्त तिच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशातच करिनाने नेहमीच बॉलिवूडमध्ये स्वत:चा एक आगळा वेगळा ट्रेंन्ड निर्माण केला आहे. अगदी झिरो फिगर बेबो पासून ते दोन बाळंतपण होईपर्यंत करीना नेहमीच लाईम-लाईट मध्ये असते. प्रसिद्धी सोबतच लोकांच्या ट्रोलिंगचाही सामना करिनाला दैनंदिन जीवनात करावा लागतो. सध्या करिनाला तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरुन नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. पण करिना या ट्रोलर्सला कश्या प्रकारे हाताळते, नकारात्मक कमेंटचा तिच्या जीवनात कसा प्रभाव पडतो याबाबत खुलासा केला आहे.करिना कपूर खान फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा आई झाली. करिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. करिना आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jahangir) असं ठेवलं आहे. आणि यावरुनच नेटकऱ्यांनी दोघांवर टीकेची झोड उठवली आहे. एका मुलाखती दरम्यान करिनाने वारंवार होणाऱ्या ट्रोलिंगचा तिला आता काहीच फरक पडत नाही असा उलगडा केला आहे.(Kareena Kapoor and Saif Ali Khan’s second child Jeh)

- Advertisement -

करिना म्हणाली, ‘मी खूप सकारात्मक व्यक्ती आहे. या कोरोना व्हायरसच्या काळात जगामध्ये सकारात्मकता पसरवणे गरजेचं आहे.मला ट्रोलर्स बद्दल विचार करण्याचा वेळ नाहीये आणि नकारात्मकतेला माझ्या आयुष्यात काहीच स्थान नाहीये. मला ट्रोलर्समुळे काहीच फरक पडत नाही.ट्रोलर्ससाठी आम्ही सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट असतो. मी नेहमीच सकारात्मक राहण्याच्या प्रर्यत्न करते.’


हे हि वाचा – तैमूरनंतर धाकटा नवाब झाला स्टार किड, जेहचे फोटो झाले व्हायरल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -