घरमनोरंजनकरीना कपूरच्या पुस्तकाचे प्रकाशन होताच काही वेळातच ठरलं बेस्टसेलर

करीना कपूरच्या पुस्तकाचे प्रकाशन होताच काही वेळातच ठरलं बेस्टसेलर

Subscribe

ॲमेझॉनवर करीनाचे पुस्तक नंबर वन बेस्टसेलरच्या यादित ट्रेंड होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor khan)नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. करीना तिच्या लूक बाबत विशेष काळजी घेताना दिसते. करीनाच्या प्रत्येक स्टइलची चर्चा चाहत्यांमध्ये तसेच बी-टाउनमध्ये रंगत असते. करीनाच जिम लूक, एयरपोर्ट लूक इतकचं नाही तर करीनाच्या प्रेग्नेंसीमधील लूकची चर्चा सोशल मीडियी तसेच माध्यमावर जोरदार रंगत होती. नुकतच करीनाने एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात करीनाच्या प्रेग्नंसी दरम्यान करण्यात आलेल्या डाएटवर, व्यायाम,स्टाईलबद्दल सांगण्यात आले आहे. एकंदरीतच करीनाने पुस्तकात तिच्या प्रेग्नंसी दरम्यनचा अनुभव शेअर केला आहे. ‘करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बाइबल’ असे पुस्तकाचे नाव असून काही वेळातच या पुस्तकाने पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे. ॲमेझॉनवर करीनाचे पुस्तक नंबर वन बेस्टसेलरच्या यादित ट्रेंड होत आहे. तसेच या पुस्तकाच्या प्री-बुकिंगसाठी लोकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे.(Kareena Kapoor’s book became a bestseller shortly after its release)

करीना कपूरचे पुस्तक ‘प्रेग्नेंसी बाइबल’ याला प्रभावशाली रूपात FOGSI, भारताच्या स्त्री रोग विशेषज्ञ आणि प्रसूति विशेषज्ञच्या आधिकृत संस्थाद्वारे वेरीफाई करण्यात आले आहे. या पुस्तकात अभ्यासकांनी दिलेल्या अनेक टिप्स समाविष्ट करण्यात आले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीनाने आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्डा’ शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा ती आमिर खानसोबत दिसणार आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – सहा महिन्यांची झाली वामिका, अनुष्काने फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -