घरमनोरंजनअसं आहे अक्षयच्या 'केसरीचं' पहिलं पोस्टर!

असं आहे अक्षयच्या ‘केसरीचं’ पहिलं पोस्टर!

Subscribe

२२ मार्चला अक्षय कुमार याचा केसरी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या केसरीची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. आज या चित्रपटाचं पहिलं पोस्टर करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कायमच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करतो. त्याच्या पॅडमॅन, गोल्ड, रुस्तम अशा अनेक चित्रपटातील अभिनयाची कायम स्तुती झाली. लवकरच अक्षय कुमार ‘केसरी’ या चित्रपटात झळकणार आहे. केसरी चित्रपटात अक्षयबरोबर अभिनेत्री परिणिती चोप्रा दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘केसरी’ या चित्रपटातून ऐतिहासिक युद्ध कथा प्रेक्षकांना बघता येणार आहे. १८९७ साली लढल्या गेलेल्या सारागढीच्या युद्धातील ३६ व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटातून उलगडणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करणार आहे. करण जोहरने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये शीख रेजिमेंटची तुकडी दिसत आहे. पोस्टरमधील या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक वेगळा भाव दिसत आहे. हा चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -