घरमनोरंजन'आदिपुरुष'मध्ये क्रितीची एंट्री,दिसणार सीतेच्या भूमिकेत

‘आदिपुरुष’मध्ये क्रितीची एंट्री,दिसणार सीतेच्या भूमिकेत

Subscribe

प्रभासच्या 'आदिपुरुष' याचित्रपटात क्रिती सेनॉन ही पाहायला मिळणार आहे. आदिपुरुषमध्ये रामायणाची कथा पाहायला मिळणार आहे.

बाहुबली या चित्रपटानंतर जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा एकमागून एक हीट चित्रपट करण्याच्या तयारीत आहे. आता प्रभास ‘आदिपुरुष’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणाची कथा यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटात प्रभास आणि सैफ अली खान हे दोघे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटात क्रिती सेनॉनची एंट्री झाली आहे. क्रितीने स्वत: सोशलमीडियावर याबाबत पोस्ट करुन चाहत्यांना माहिती दिली आहे. क्रितीने एक फोटो शेअर केला आहे आणि त्यात तिच्यासोबत प्रभास आणि सनी सिंगसुद्धा आहेत. एका नव्या प्रवासाला सुरुवात होतेय. माझ्या खूप खास व्यक्तींपैकी हे आहेत. आदिपुरुषचा भाग झाल्याबद्दल खूप आनंद आहे. असे कॅप्शन देवून क्रितीने आदिपुरुष या चित्रपटातील तिच्या नव्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 आदिपुरुष मध्ये प्रभास श्रीरामाची, क्रिती सीतेची आणि सनी लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजतंय. या बहुप्रतिष्ठित चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे या चित्रपटात आता पुढे अजून कोण नव्या भूमिकेत दिसणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

- Advertisement -

या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी दीपिकाला निवडण्यात आले होते. मात्र दीपिकाने आणि प्रभास आधीच नाग अश्विनच्या चित्रपटात काम करणार आहेत त्यामुळे दोनही चित्रपटांचे शूटिंग करणं जमत नसल्याने दीपिकाने माघार घेतली. पण यामुळे क्रितीला मात्र मोठी भूमिका करायला मिळाली. क्रितीचा प्रभास आणि सैफ सोबत ‘आदिपुरुष’ हा पहिलाच चित्रपट असणार आहे.


हे वाचा- अमिताभ बच्चन FIAF पुरस्काराचे भारतातील पहिले मानकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -