घरमनोरंजनLata mangeshkar- लतादीदींची अधूरी प्रेम कहाणी...

Lata mangeshkar- लतादीदींची अधूरी प्रेम कहाणी…

Subscribe

कधीकाळी लतादीदींही प्रेमात पडल्या होत्या....

भारताची गानकोकीळा,गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. अतिशय खडतर परिस्थितीतून लतादीदींनी आपल्या कुटुंबाला आधार दिला होता. त्यासाठी त्या आजीवन अविवाहीत राहील्या. मात्र कधीकाळी लतादीदींही प्रेमात पडल्या होत्या. ते व्यक्ती होते बीसीसीआयचे दिवंगत माजी अध्यक्ष राज सिंह डुंगरपूर. राज सिंह हे डुंगरपूरचे महाराजाही होते.

शाही घराण्यातील राज सिंह आणि लतादीदी यांची मैत्री त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळे झाली होती. लतादीदींना क्रिकेट खेळ आवडायचा. तर राज सिंह लता दीदींचे चाहते होते. लतादीदींच्या गाण्यांची एक कॅसेट सतत त्यांच्या खिशात असायची. ते प्रेमाने लतादीदींना मिठ्टू हाक मारायचे. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच काही होते. राज सिंह यांनी त्यांच्या वडिलांजवळ लतादीदींबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांनी त्यास नकार दिला. एक सामान्य घरातील मुलगी राजेशाही घराण्याची सून बनू शकत नाही असे वडिलांनी राज सिंह यांना बजावून सांगितले.

- Advertisement -

त्यानंतर लतादीदी आणि राज सिंह यांनी कधीही लग्न केले नाही. दोघेही अविवाहीत राहीले. पण त्यांच्यातील मैत्री मात्र कायम राहीली. 12 सप्टेंबर 2009 रोजी राज सिंह यांचे निधन झाले. त्यानंतर लतादीदीही मनातून खचल्या होत्या. त्यांना त्या दुखातून बाहेर .येण्यास बराच वेळ लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -