Lata Mangeshkar: लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

लतादीदींच्या अंत्यसंस्काराची तयारी शिवाजी पार्कवर सुरू झाली.

PM narendra modi will arrive in mumbai at 4.30 for lata mangeshkar funeral
Lata Mangeshkar: लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी लतादीदींचं वयाच्या ९३व्या वर्षी निधन झालं. या दुखःत बातमीमुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून दोन दिवस राष्ट्रीय ध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अंत्यदर्शनासाठी उपस्थितीत राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ४.१५ वाजता मुंबईत दाखल होणार आहेत.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. मोदी म्हणाले की, ‘शब्दांमध्ये मला व्यक्त होता येणार नाही. आपल्याला लतादीदी सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली असून जी कुणीही भरुन काढू शकत नाही. भारतीय संस्कृतीमधील एक दिग्गज म्हणून येणारी पिढी ही त्यांना स्मरणात ठेवतील. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’

दरम्यान लतादीदींच्या अंत्यसंस्काराची तयारी शिवाजी पार्कवर सुरू झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवाजी पार्क येथे दाखल झाले असून त्यांनी अंत्यसंस्काराच्या तयारीचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत पोलीस सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त मुंबई महापालिका किरण दिघावर देखील उपस्थितीत होते. लतादीदींवर आज संध्याकाळी ६.३० वाजता शासकीय इमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.


हेही वाचा – Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, शासकीय इतमामात अंत्यसंस्काराच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना