घरCORONA UPDATEकोरोनाच्या काळात आपण सगळेच म्हणूयात, ‘We can, We shall overcome’

कोरोनाच्या काळात आपण सगळेच म्हणूयात, ‘We can, We shall overcome’

Subscribe

महेश मांजरेकर यांनी या गाण्यातून पहिल्यांदाच गीतलेखन केलेलं आहे. अभिषेक नेलवाल, शैली बिडवईकर आणि हितेश मोडक यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत आहे

कोरोना संकटातून आपण नक्कीच बाहेर पडू हा विश्वास देणारं नवीन गाणं महेश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून उतरलं आहे.  कोरोनामुळे सगळं जग सध्या ठप्प झालेलं असलं तरी डाॅक्टर्स, मेडिकल स्टाफ, पोलिस कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवा पुरवठादार… हे अहोरात्र मेहनत करुन, जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करतायत. अशा ‘कोविड वाॅरियर्स’ना हे गाणं समर्पित करण्यात आलंय.

महेश मांजरेकर यांनी या गाण्यातून पहिल्यांदाच गीतलेखन केलेलं आहे. अभिषेक नेलवाल, शैली बिडवईकर आणि हितेश मोडक यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत आहे. यात सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील तसंच पृथ्वी शाॅ आणि श्रेयस अय्यर या आजी-माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या सर्वांनी अर्थातच आपापल्या घरातून व्हिडीओ शूट केलेला आहे.

- Advertisement -

याच लाॅकडाऊनच्या काळात महेश मांजरेकर यांनी घरीच राहणं कसं गरजेचं आहे हे सांगणारी एक शाॅर्टफिल्मही घरच्या घरीच बनवली होती.  शाॅर्टफिल्मला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर त्यांना म्युझिक व्हिडीओची कल्पना सुचली. त्यांनी गाणं कागदावर उतरवलं आणि संगीतबद्ध झालेलं गाणं ऐकवल्यावर विविध क्षेत्रातील त्यांच्या मित्रांनी ही कल्पना उचलून धरली. महेश मांजरेकर यांचं पूर्ण कुटुंब या व्हिडीओत तुम्हाला भेटणार आहेच पण त्याबरोबरच विद्युत पूजा सावंत, शिवाजी साटम, प्रवीण तरडे, सचिन खेडेकर, तुमच्या भेटीला येत आहेत.

सध्या आपण सगळे आपापल्या घरात बंदिस्त आहोत. भविष्याच्या चिंतेने हळूहळू सर्वांनाच उदासवाणं वाटू लागलंय. लाॅकडाऊनला पन्नास दिवस उलटून गेलेत आणि या दिवसात कोरोनाशी खऱ्या अर्थाने सामना करतायत ते ‘कोविड वाॅरियर्स’… त्यांच्या हिंमतीला सलाम करण्यासाठी आणि घरात बसून चिंताग्रस्त असलेल्या जनतेचं मनोधैर्य उंचावण्यासाठी या गाण्याची कल्पना मला सुचली. यापूर्वीही अनेक संकटांचा मुकाबला आपण केलेला आहे, तसंच या कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडणारच हा विश्वास जागवणारं हे गाणं आहे. अशा प्रकल्पांसाठी आजवर सारस्वत बॅंकेनं नेहमीच मला साथ दिली आहे. या गाण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी मी सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचे मनापासून आभार मानतो.
– महेश मांजरेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -