घरताज्या घडामोडीपतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीने पहिल्यांदा शेअर केला तिचा सुंदर हसरा फोटो

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीने पहिल्यांदा शेअर केला तिचा सुंदर हसरा फोटो

Subscribe

मंदिराला हसताना पाहून तिचे मित्र मैत्रिणी आणि चाहते फार आनंदी आहेत

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi ) तिचा पती राज कौशलच्या निधनानंतर हळू हळू नॉर्मल होत आहे. ३० जून रोजी राज कौशल याचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर मंदिरा आपली मुले आणि कुटुंबाला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. पतीच्या निधनाला एक महिना होऊन गेल्यानंतर मंदिरा थोडी सावरताना दिसत आहे. अनेक कलाकार मित्र मैत्रिणी मंदिराला पुन्हा रिकव्हर होण्यासाठी मदत करत आहेत. पतीच्या निधनानंतर मंदिराने पहिल्यांदा तिचा सुंदर हसतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती जमिनीवर बसून छान हसताना दिसत आहे. वर्कआउट नंतर काढलेला मंदिराचा हा फोटो पाहून ती आता दु:खातून सावरत असल्याचे दिसत आहे. (Mandira Bedi shared her beautiful smiling photo for the first time after her husband’s death)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)


‘जेव्हा माझी लाडकी लेक वर्कआउट नंतर मला हसायला सांगते तेव्हा एंडोर्फिंस ( एक हार्मोन ) आपले काम करण्यास सुरू करते…मी त्याला नाही कसं म्हणू’ #beginagain, असे म्हणत मंदिराने तिचा सुंदर हसरा फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिच्यावर असलेले प्रेम व्यक्त केले आहे. अनेकांनी कमेंट करत मंदिराला प्रोत्साहन दिले आहे. मंदिराला हसताना पाहून तिचे मित्र मैत्रिणी आणि चाहते फार आनंदी आहेत. समीर सोनी, मौनी रॉय, आश्का गोराडिया तिच्या पोस्टचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

३० जून रोजी मंदिराचा पती राज कौशलचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले. राज कौशलचे जाणे हे मंदिरासोबतच संपूर्ण बॉलिवूडला चटका लावणारे होते. राज कोणत्याही प्रकारची शारीरिक व्याथी नव्हती मात्र तरीही वयाच्या ४९ व्या वर्षी हार्ट अटॅकने राज कौशलचा मृत्यू झाला.


हेही वाचा – Ghum Hai Kisikey Pyaar Mein: छोट्या पडद्यावर रेखाची एंट्री होणार, प्रेक्षकांना घालणार भुरळ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -