घरमनोरंजनमराठमोळा आदिनाथ ‘83’ चित्रपटात..

मराठमोळा आदिनाथ ‘83’ चित्रपटात..

Subscribe

आदिनाथ कोठारे हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येकालाच ओळखीचे आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड आणि लहानपणातच वडिलांच्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आता मोठेपणी देखील अनेक मराठी चित्रपट तसेच वेब सिरीज मध्ये तो झळकला आहे. माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या 15 ऑगस्ट या ट्रिपल एक्स ओरिजनल मध्ये नुकताच त्याने अभिनय केला.

 

View this post on Instagram

 

Squad of ‘83 has left the building ! ?. @83thefilm #83 #83thefilm #kapildev #kapilsdevils #dilipvengsarkar

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

- Advertisement -

लवकरच आदिनाथ प्रेक्षकांना कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारीत असणाऱ्या ‘83’ या बिग बजेट बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार आहे. आदिनाथने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असून आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे देखील नाव घेतले होते. केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याची स्वतंत्र ओळख त्याने निर्माण केली आहे. त्यातच आता आदिनाथने आपली पाऊलं बॉलिवूडकडे वळविली आहे. आदिनाथ लवकरच ‘83’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

- Advertisement -

कबीर खान दिग्दर्शित ‘83’ मध्ये आदिनाथ पूर्व भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिनाथ लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून या चित्रपटात काम करण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. मात्र या चित्रपटातील आणखी एक नाव पुढे आले आहे. या चित्रपटात साहील खट्टर ही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -