घरमनोरंजनमिताली नंतर सिद्धार्थ चांदेकर सखीच्या प्रेमात 'बेफाम'

मिताली नंतर सिद्धार्थ चांदेकर सखीच्या प्रेमात ‘बेफाम’

Subscribe

येत्या २६ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सखी गोखले हे मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर नुकतेच लग्नबंधानात अडकले आहेत. मात्र आता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री सखी गोखलेच्या प्रेमात बेफाम होताना दिसणार आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांचा नवीन सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमातचे पोस्टर समोर आले होते. त्यात पाठमोरी व्यक्ती कोण आहे या प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता सखी आणि सिद्धार्थची जोडी सर्वांसमोर आली आहे. ‘बेफाम’ असे या नव्या सिनेमाचे नाव आहे. येत्या २६ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सखी गोखले हे मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

सखी आणि सिद्धार्थ ही जोडी पहिल्यांदाच सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मैत्री, प्रेम, विश्वास या सर्व भावनांची एकत्रीत गुंफण या सिनेमात पाहता येणार आहे. लेथ जोशी, परफ्युम, हलाल यासांरख्या यशस्वी सिनेमानंतर अमोल कागणेने बेफाम या सिनेमाची निर्मिती केली आहे. एक वेगळा विषय या सिनेमातून हाताळण्यात आला आहे. सखी आणि सिद्धार्थ ही जोडगोळी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आणण्याचे काम अमोलने केले आहे. अपयशातून यशाच्या शिखराकडे वाटचाल करण्यासाठी बळ देणारा हा सिनेमा असणार आहे. एक सकारात्मकता या सिनेमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. सिद्धार्थ आणि मितालीची लव्हेबल केमिस्ट्री सिनेमातून पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. सिद्धार्थ सध्या मराठी मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे. सांग तू आहेस ना? या मराठी मालिकेतून सिद्धार्थ सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर अभिमेत्री सखी गोखले ही नुकतीच लंडनहून तिचे शिक्षण पूर्ण करुन भारतात परतली आहे. नवीन वर्षात सखीचा हा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


हेही वाचा – ‘या’ दिवशी ‘The Kapil Sharma Show’ घेणार प्रेक्षकांचा निरोप!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -