घररायगडकुंभे प्रकल्पासह पन्हळघर बंधार्‍याचे काम मार्गी लागणार - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

कुंभे प्रकल्पासह पन्हळघर बंधार्‍याचे काम मार्गी लागणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Subscribe

अलिबागचा सांबरकुंड प्रकल्प एक महिन्याच्या आत मार्गी लागणार असून, तालुक्यातील कुंभे जलप्रकल्प आणि पन्हळघर बंधार्‍याचे काम मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

अलिबागचा सांबरकुंड प्रकल्प एक महिन्याच्या आत मार्गी लागणार असून, तालुक्यातील कुंभे जलप्रकल्प आणि पन्हळघर बंधार्‍याचे काम मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, अशी निःसंदिग्ध ग्वाही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली. जलसंपदा भवनाच्या येथील नूतन वास्तुचे लोकार्पण सोमवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती अलका जाधव, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, महाड-पोलादपूर-माणगांव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बाबू खानविलकर, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि इतर उपस्थित होते.

पाटील यांनी या भवनाच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय सुनील तटकरे यांना दिले. माणगाव शहरासाठी काळ नदीवर बंधारा बांधून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. खा. तटकरे यांनी कोकणचे पाणी इतरत्र न वळवता त्याचे इथेच योग्य नियोजन करावे अशी मागणी केली. तर जिल्ह्यातील विविध प्रकल्प लागावे अशी विनंती पालकमंत्री तटकरे यांनी केली. आ. गोगावले आणि आ. तटकरे यांचीही भाषणे झाली.

- Advertisement -

हेही वाचा –

राजभवनाकडे न जाता राष्ट्रपती भवनाला निवेदन देणार, संयुक्त किसान मोर्चाचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -