घरमनोरंजन‘गांधी-गोडसे एक युद्ध’मध्ये मराठमोळा अभिनेता साकारणार नथुराम गोडसेंची भूमिका

‘गांधी-गोडसे एक युद्ध’मध्ये मराठमोळा अभिनेता साकारणार नथुराम गोडसेंची भूमिका

Subscribe

‘द लेजंड ऑफ भगत सिंह’, ‘दामिनी’, ‘घायल’ आणि ‘खाकी’ यांसारच्या थ्रिलर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे राजकुमार संतोषी 9 वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शन करणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. येत्या 26 जानेवारी 2023 रोजी त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by INOX (@inoxmovies)

या पोस्टरमध्ये नथुराम गोडसे यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसत आहे. तर महात्मा गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता दीपक अंतानी दिसून येत आहे. या पोस्टर शिवाय एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील संवाद येथे दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ आणि ‘पठाण’मध्ये होईल काटे की टक्कर
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. याचं दरम्यान, आता 26 जानेवारी 2023 रोजी राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ देखील प्रदर्शित होईल त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाबाबत काटे की टक्कर पाहायला मिळेल.

 

- Advertisement -

हेही वाचा :

‘दृश्यम 2’ आणि ‘अवतार 2’ मुळे रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ ला फटका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -