घरमनोरंजनकलाकारांचा 'असा' ही महाराष्ट्र दिन

कलाकारांचा ‘असा’ ही महाराष्ट्र दिन

Subscribe

महाराष्ट्राविषयी असणारं प्रेम, आदर आणि आपल्या जबाबदारीची जाणीव या वेळी सेलेब्रेटींनी महाराष्ट्रातील जनतेला करून दिली आहे.

आज १ मे महाराष्ट्र दिन. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येतो. याच दिवशी कामार दिन देखील साजरा केला जातो. आज सोशलमिडीयावर महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यात सेलेब्रेटीनीही आपल्या भावना सोशलमिडीयावर व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राविषयी असणारं प्रेम, आदर आणि आपल्या जबाबदारीची जाणीव या वेळी सेलेब्रेटींनी महाराष्ट्रातील जनतेला करून दिली आहे.

अभिनेता सुबोध भावेने आपल्या नवीन आलेल्या ‘अश्रृंची झाले फुले’ या नाटकाचे पोस्टर शेअर करत सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्वांना महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
६ वर्षानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर काम करतोय. आज दुपारी १२.३० वाजता नाशिक ,कालिदास पासून सुरवात…’ असं सुबोधने ही पोस्ट शेअर करताना लिहीलं आहे.

- Advertisement -

 तर सगळ्यांच्या लाडक्या भाडीपा ने महाराष्ट्र दिना निमित्त एक खास गाणं तयार केलं आहे. एरवी अभिनय करणारे हे आज कास महाराष्ट्र गीत गाताना दिसत आहेत.

- Advertisement -

चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा’, अशा ओळी लिहीत ‘महाराष्ट्राच्या ज्या काही मुलभूत गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात’, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

तर अभिनेता जितेंद्र जोशीने ही अभिमान गीत लिहीत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


अभिनेता रितेश देशमुख यानेदेखील महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गर्व आहे मला या मातीत जन्मल्याचा!’, असं कॅप्शन त्याने शेअर केलेल्या पोस्टला दिलं आहे. रितेश ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून तो कायम अशा दिनांचं औचित्य साधून चाहत्यांना शुभेच्छा देत असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -