घरमनोरंजनRanbir Alia Wedding : लग्न आलिया रणबीरच् पण चर्चा मात्र भांडीवालीची

Ranbir Alia Wedding : लग्न आलिया रणबीरच् पण चर्चा मात्र भांडीवालीची

Subscribe

रणबीर आलियाच्या लग्नाबद्दल काही बोलू नये, पण त्याच्या वास्तूगृहातील काही व्हिडिओ (Video) आणि फोटो (Photo) बरेच काही सांगून जाताना दिसत आहे. यांच्या लग्नासंबंधित आता एक नवीन व्हिडिओ समोर येत आहे.

सध्या अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची खूप चर्चा होत आहे. तसेच त्या दोघांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसताहेत. रणबीर आलियाच्या लग्नाबद्दल काही बोलू नये, पण त्याच्या वास्तूगृहातील काही व्हिडिओ (Video) आणि फोटो (Photo) बरेच काही सांगून जाताना दिसत आहे. यांच्या लग्नासंबंधित आता एक नवीन व्हिडिओ समोर येत आहे. जे पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येईल.

 

- Advertisement -

रणबीर आलियाला अनुष्का-विराट आणि कतरिना-विक्रीप्रमाणे आपलं लग्न गुपित ठेवायचं आहे. तसेच लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी खूप प्रयत्न केला जात आहे. त्यांनी कितीही लपवले तरी पापाराझीच्या (Paparazzi) कॅमेऱ्यापासून तुम्ही काहीही लपवू शकत नाही.

- Advertisement -

त्यांच्या लग्नासंबंधित आता एक नवीन व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल भयानीने त्याच्या इंटाग्रामवरून एक व्हिडिओ अपलोड केला असून त्या व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये भरलेली भांडी ठेवली आहेत. त्या ट्रकमध्ये भांड्याबरोबर एक व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच लगेच पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. पण कॅमेऱ्यामध्ये काहीतरी टिपत असलेले पाहून कोणीतरी येऊन ट्रकचे शटर बंद करण्यास सांगितले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणबीरच्या घराबाहेर भांड्या व्यतिरिक्त त्याचे दोन कुत्रेही दिसत आहे. हे दोन्ही कुत्रे त्याच्या खूप जवळचे आहेत. रणबीरने खूपदा या दोन्ही कुत्र्याबरोबर फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. रणबीर आलियाने वेडिंग स्क्वॉड इव्हेंट (Wedding Squad Event) कंपनीला लग्नाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लग्नामध्ये प्रवेशासाठी केशरी रंगाचा बँड इव्हेंट कंपनीकडून दिला होता.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -