घरमनोरंजनसना खानच्या माजी प्रियकराने व्हायरल केली क्लिप; केले धक्कादायक आरोप

सना खानच्या माजी प्रियकराने व्हायरल केली क्लिप; केले धक्कादायक आरोप

Subscribe

सनाच्या एक्स बॅायफ्रेंडने आपल्या इंस्टाग्रामवरुन त्या दोघांमधील कॅाल रेकॅार्डिंग शेअर करत तिची पोलखोल केली आहे. यामध्ये सना अणि लुईस या दोघांमधील संभाषण ऐकू येत आहे.

बॅालीवुड अभिनेत्री सना खान आपल्या वैयक्तिक जीवनातील अनेक घटनांमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती डान्स ट्रेनर मेल्विन लुईसला डेट करत होती, अनेकदा दोघे एकत्र फिरताना दिसले होते. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. आपल्या ब्रेकअपमुळे सनाला खूप दुःख झाले आहे. मात्र आता सनाच्या एक्स बॅायफ्रेंडने आपल्या इंस्टाग्रामवरुन त्या दोघांमधील कॅाल रेकॅार्डिंग शेअर करत तिची पोलखोल केली आहे. या व्हिडिओमध्ये सना अणि लुईस या दोघांमधील संभाषण ऐकू येत आहे.

एका इव्हेंटमध्ये सनाला दुःख अनावर झाल्याने ती ढसाढसा रडली होती.

- Advertisement -

या कॅाल रेकॅार्डिंगमध्ये सना म्हणते कि, ‘तुझी इमेज खराब करण्याचा माझा प्लॅन होता. मी तुला अपमानित केले, कारण असे करुन मला सार्वजनिक जीवनात आनंद मिळतो. यावर लुईस उत्तर देतो कि, तुझा असा काही प्लान असेल हे मला पक्के ठाऊक होते. पुढे तो म्हणतो कि, तू माझी खिल्ली उडवलीस, माझ्या धर्मावरुन आणि माझ्या रंगावरुन बोललीस. माझ्या कुटुंबाचाही तू अपमान केलास. माझ्या मते तू तुझे काम केले. निश्चित तुला आनंद मिळाला असेल, असे कॅप्शन त्याने व्हिडिओला दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -