घरमनोरंजनअभिनेता मिलिंद गुणाजीने उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

अभिनेता मिलिंद गुणाजीने उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

Subscribe

दरम्यान अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता मिलिंद गुणाजी आणि उद्धव ठाकरे हे चांगले मित्र आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सायंकाळी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कल्पनेतील सेट यावेळी शिवतीर्थावर उभारण्यात आला आहे. या सोहळ्याला देशभरातून मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बॉलीवूड पासून मराठीतील कलाकार उपस्थित असणार आहेत. दरम्यान अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता मिलिंद गुणाजी आणि उद्धव ठाकरे हे चांगले मित्र आहेत.

काय म्हणाले मिलिंद गुणाजी?

मिलिंद गुणाजी यांनी त्यांचे मित्र उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंद गुणाजी म्हणाले की, “आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र आणि आमचे अगदी जवळचे मित्र उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहेत. ज्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून मातोश्रीचा, सेनेचा स्नेहसंबंध आहे. अतिशय सुसंस्कृत, सहृदय माणूस Gem of Person. ज्यांच्याकडे उत्कृ्ष्ट अॅडमिनिस्ट्रेटिव क्वालिटीज सुद्धा आहेत. असा माणूस या पदावर बसतोय याचा खरंच आनंद होत आहे. आमच्या सगळ्यांकडून त्यांना मनापासून शुभेच्छा.”

- Advertisement -

‘हवाई मुलूखगिरी’ मध्ये उद्धव ठाकरेंची छायाचित्रं

अभिनेता मिलिंद गुणाजी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही चांगले मित्र आहेत. मिलिंद गुणाजी यांना भटकंतीचा तर उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद आहे. या छंदामुळे दोघांचाही मेळ चांगलाच जुळून येतो. दोघंही अनेकदा भटकंतीसाठी जातात. एवढेच नाही तर मिलिंद गुणाजी यांच्या ‘हवाई मुलूखगिरी’ या पुस्तकातील सर्व छायाचित्र ही उद्धव ठाकरेंनी टिपलेली आहेत. ‘हवाई मुलूखगिरी’ या पुस्तकात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी एरिअर शॉर्ट द्वारे टिपलेले राज्यातील गडकिल्ले डोळ्यांचे पारणे फेडतात.

- Advertisement -

शपथविधीला उपस्थिती

आज शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मिलिंद गुणाजी यांसह बॉलीवूडमधील आमिर खान, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, आशा भोसले आणि इतर कलाकाल सु्द्धा उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -