घरमनोरंजनकंगना रनौतचा 'रक्षाबंधन' चित्रपटाच्या लेखिकेवर निशाणा

कंगना रनौतचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या लेखिकेवर निशाणा

Subscribe

या चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लन यांचे जुन्या ट्वीटमुळे हा वाद होत आहे. कनिकाने गौमूत्र ला खूप ट्वीट केलं होतं, ज्याला यूजर्स हिंदू विरोधी असल्याचं म्हटलं जात आहे

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बहुप्रतिक्षीत ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर सध्या मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटबाबत #बायकॉट हे ट्रेंड करत आहे. यादरम्यान आता अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. ट्वीटरवर यूजर्स या चित्रपटाला विरोध करताना दिसून येत आहेत. खरंतर, या चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लन यांचे जुन्या ट्वीटमुळे हा वाद होत आहे. कनिकाने गौमूत्र ला खूप ट्वीट केलं होतं, ज्याला यूजर्स हिंदू विरोधी असल्याचं म्हटलं जात आहे.
या प्रकरणा दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतने देखील या वादात उडी घेत प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाचा कनिकावर निशाणा
एका वेब पोर्टलच्या मते कनिकाने आपले अनेक जुने ट्वीट डिलीट केले आहेत. कारण, ते ट्वीट हिंदू विरोधी होते. कंगनाने पोर्टलनुसार आपले मत मांडत कंगनाने रक्षाबंधन चित्रपटाला निशाण्यावर घेतलं. कंगाना म्हणाली की, केवळ पैश्यांचे नुकसान होईल म्हणून हिंदू विरोधी ट्वीट त्यांनी डिलीट केले.

- Advertisement -

या पोस्टमध्ये कंगनाने लिहिलं की, “हाहा, त्यांनी आर्थिक नुकसानापेक्षा जास्त काही होत नाही….फक्त आर्थिक नुकसाची भीतीचं त्यांच्यातून हिंदू फोबिया आणि भारत विरोधी डिलीट करू शकतात..आणि काही नाही.”

- Advertisement -

अक्षय कुमार आणि आमिर खानमध्ये होणार टक्कर
अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे, शिवाय याचं दिवशी आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ सुद्धा रिलीज होणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांपैकी प्रेक्षक नक्की कोणता चित्रपट पाहणं पसंत करतील याकडे सर्वांचेच लक्ष असेल.


हेही वाचा :अवघ्या चार दिवसांत ‘टाइमपास 3’ ने केली कोटींची कमाई

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -