घरमनोरंजनअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर 'आदिपुरुष'चे मोशन पोस्टर रिलीज

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे मोशन पोस्टर रिलीज

Subscribe

आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आले. हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये ‘जय श्री राम’ या सुंदर ऑडिओ क्लिपसह शेअर केलेल्या छोट्या गाण्यासोबत नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अजय-अतुल या लोकप्रिय जोडीने हे गाणे संगीतबद्ध केले असून, या गाण्याचे बोल मनोज मुनताशीर यांनी लिहिले आहेत.

‘आदिपुरुष’चे मोशन पोस्टर रिलीज

 

View this post on Instagram

 

A post shared by Om Raut (@omraut)

आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले ज्यात श्री रामांच्या भूमिकेत प्रभास दिसत आहे. तसेच या मोशन पोस्टरमध्ये जय श्री रामाची घोषणा देखील ऐकू येत आहे. या मोशन पोस्टर खाली दिग्दर्शकांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “जेव्हा तुम्ही सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, तेव्हा फक्त परमेश्वराचे नाव घ्या…जय श्री राम”

- Advertisement -

दरम्यान, हे मोशन पोस्टर पाहून अनेकजण चित्रपटाचा टीझर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी राम नवमीच्या निमित्ताने या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले होते.

प्रभास आणि कृति सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसेल तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसेल. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-2’ सारख्या चित्रपटानंतर प्रभासला या अवतारात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -