घरदेश-विदेशUN एजन्सीचे 2022 हवामानाचे मूल्यांकन; भविष्याबद्दल व्यक्त केली भीती

UN एजन्सीचे 2022 हवामानाचे मूल्यांकन; भविष्याबद्दल व्यक्त केली भीती

Subscribe

नवी दिल्ली : युनायटेड नेशन्सची हवामान संस्था आणि जागतिक हवामान संघटनेने (WMO) 2022 च्या हवामानाचे मूल्यांकन प्रसिद्ध करताना भविष्याबद्दल भीती व्यक्त केली आहे. एजन्सीने सांगितले की, 2022 हे वर्ष हवामानाच्या दृष्टीने इतके वाईट होते. संपूर्ण जग प्राणघातक पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांशी झुंज देत असताना लोक दुरव्यवस्थेचे बळी ठरले आहेत.

जागतिक हवामान संघटनेच्या स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट 2022 च्या अहवालानुसार, 2022 मध्ये जगभरातील महासागरांची तापमानवाढ विक्रमी उच्चांकावर होती. त्यामुळे अंटार्क्टिक समुद्रातील बर्फ आणि युरोपातील बर्फाळ आल्प्स हिमनद्या त्यांच्या विक्रमी निम्न पातळीवर पोहोचल्या असून जागतिक स्तरावर समुद्रांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे हवेतील उष्णतेला अडकवणारे कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनचे प्रमाण सर्वाधिक नोंदवले गेले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवारांचे “स्टार” चमकणार कधी? कर्नाटकात “प्रचार”कही नाहीत

शास्त्रज्ञांनी जगभरातील हवामानाची चाचणी घेण्यासाठी ज्या हिमनद्यांची तपासणी केली होती, त्या 2022 मध्ये सुमारे 1.3 मीटर म्हणजेच 51 इंचांपर्यंत वितळल्या आहेत. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित हिमनद्यामध्येही उन्हाळ्याच्या कालावधीत अजिबात बर्फ शिल्लक नव्हता. धक्कादायक बाब अशी आहे की, 1990 च्या तुलनेत समुद्राच्या पाण्याची पातळी दुप्पट वेगाने वाढत आहे.

- Advertisement -

जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस पीटरी तालास म्हणाले की, वेगाने वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे या शतकाच्या अखेरीस महासागरांच्या पाण्याची पातळी २० ते ३९ इंच म्हणजे एक ते दीड मीटरपर्यंत वाढू शकते. त्यांनी इशारा दिला आहे की, कार्बन आणि इतर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर अंकुश असतानाही हवामानाच्या नमुन्यातील नकारात्मक बदल आणि सर्व मापदंड 2060 पर्यंत चालू राहू राहणार आहेत. प्रदूषणामुळे पर्यावरणाचे आधीच नुकसान झाले आहे. त्यात आता हिमनद्या वितळणे आणि समुद्राची पातळी वाढणे सुरू झाल्यामुळे भविष्याबद्दल भीती व्यक्त केली जात आहे.

100 देशांमध्ये पुरेशा हवामान सेवा उपलब्ध नाहीत
सध्या जगभरातील सुमारे 100 देशांमध्ये पुरेशा हवामान सेवा उपलब्ध नाहीत. या सेवा पुरवण्यासाठी निरीक्षण नेटवर्कमध्ये सुधारणा आणि चेतावणी, जलविज्ञान आणि हवामान सेवा क्षमतांमध्ये गुंतवणूक आवश्यक आहे. हिमनद्यांमधून गमावलेल्या बर्फाचे एकूण प्रमाण 26 मीटरपेक्षा जास्त पाण्याच्या समतुल्य आहे. वस्तुमान संतुलन हा काळानुसार हिमनद्यांच्या वस्तुमानात होणारा बदल मोजण्याचा एक मार्ग आहे. बर्फाचे एकूण प्रमाण आणि वितळत असलेल्या बर्फाचे प्रमाण वजा करून त्याची गणना केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -