घरताज्या घडामोडीMS Dhoni: The Untold Story सिनेमाला ५ वर्षे पूर्ण, सुशांतचे फॅन्स झाले...

MS Dhoni: The Untold Story सिनेमाला ५ वर्षे पूर्ण, सुशांतचे फॅन्स झाले भावूक

Subscribe

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुशांतमुळे संतापला होता धोनी

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant singh rajput) आजही चाहते विसरलेले नाही. सुशांतच्या अनेक आठवणी आजही चाहते शेअर करत असतात. सुशांतने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फार कमी वेळात प्रेक्षकांचे मन जिंकले होते. एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (MS Dhoni: The Untold Story) या सिनेमाने सुशांतचे नशीब खऱ्या अर्थाने बदलले होते. आज या सिनेमाला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. (MS Dhoni: The Untold Story Movie complete 5 years)  सुशांतच्या अभिनय कारकिर्दीतील एमएस धोनी हा सिनेमा फार महत्त्वाचा ठरला होता. भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी याच्या आयुष्यावर हा सिनेमात होता यात सुशांतने धोनीची प्रमुख भुमिका साकारली होती. सुशांत आज या जगात नसला तरीही त्याचे चाहते त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.

सुशांतमुळे संतापला होता धोनी

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर गूगलवर धोनी असे सर्च केल्यानंतर धोनी ऐवजी सुशांत सिंह राजपूतचाच फोटो समोर येत होता. यामुळे धोनी फार चिडला होता असे सुशांतने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते. हा किस्सा त्यावेळी फार चर्चेत आला होता.

 

- Advertisement -

विरल भयानीने आपल्या सोशल मीडियावर सुशांत सिंहचा क्रिकेट खेळतानाचा एक थ्रो बॅक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुशांत हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळताना दिसत आहे. सुशांतचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते भावूक झालेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सुशांत सिंह राजपूत आणि महेंद्र सिंह धोनी यांनी एकत्र येऊन सिनेमाचे प्रमोशन देखील केले होते. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या होत्या. ध्येय गाठण्यासाठी अधिकचा प्रवास महत्त्वाचा असतो. या गोष्टीत आमच्यात साम्य आहे. आमच्या दोघांत काही तरी साम्य आहे असे मला सिनेमाच्या शुटींगवेळी जाणवले होते, असे सुशांतने म्हटले होते.


हेही वाचा – BB15: रिया चक्रवर्ती सर्वात महागडी स्पर्धक, एका आठवड्यासाठी घेणार ३५ लाख?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -