घरताज्या घडामोडीBB15: रिया चक्रवर्ती सर्वात महागडी स्पर्धक, एका आठवड्यासाठी घेणार ३५ लाख?

BB15: रिया चक्रवर्ती सर्वात महागडी स्पर्धक, एका आठवड्यासाठी घेणार ३५ लाख?

Subscribe

रिया चक्रवर्ती बिग बॉस १५ मध्ये केवळ एका आठवड्यासाठी येणार असून एका आठवड्यासाठी ३५ लाख रुपये मानधन स्वीकारणार

Bigg Boss 14ची सुरुवात झाल्यापासून शो चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस १५ मध्ये आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीची (Riya Chakraborty)  एंट्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिया शोमध्ये सहभागी होण्यासाठी घेणार असलेले मानधन पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती बिग बॉस १५ मध्ये केवळ एका आठवड्यासाठी येणार असून एका आठवड्यासाठी ३५ लाख रुपये मानधन ती स्वीकारणार आहे.

- Advertisement -

काहीच दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती तेजस्वी प्रकाश आणि दलजीत कौर यांच्यासोबत बिग बॉसच्या स्टुडिओबाहेर दिसली होती. यावरुन ती बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार असल्याचे फिक्स झाल्याचे सांगितले जात आहे. बॉलिवूडलाइफ रिपोर्टनुसार, बिग बॉस मेकर रिया चक्रवर्तीला ३५ लाख रुपये देणार आहे. दोन आठवड्यांसाठी रिया बिग बॉसच्या घरात गेली तर त्याचे ७० लाख रुपये तिला देण्यात येतील, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला दोन आठवड्यांसाठी ३५-४० लाख रुपये देण्यात येत होते. ही सर्वात मोठी रक्कम मानण्यात येते. तर अभिनेत्री रश्मी शुक्लाही सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक होती. रश्मीला एका आठवड्याचे २१ लाख रुपये मिळत होते असे सांगण्यात येते.

 

अभिनेत्री रिया चक्रवर्ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर वादाच्या भोवऱ्यात आली होती. सुशांतला आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ड्रग्ज प्रकरणी तिला NCB कडून अटक देखील करण्यात आली होती. खरंतर बिग बॉस १४ साठी देखील रिया चक्रवर्तीचे नाव पुढे आले होते मात्र १४व्या सीजनमध्ये रिया दिसली नाही. बिग बॉसच्या १५व्या सीजन रिया दिसणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 


हेही वाचा – Khatron Ke Khiladi 11मधील अभिनेत्री श्वेता तिवारी रुग्णालयात दाखल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -