घरमनोरंजनलठ्ठपणामुळे अस्वस्थ होती विद्या बालन; करत होती स्वतःचाच तिरस्कार, म्हणाली...

लठ्ठपणामुळे अस्वस्थ होती विद्या बालन; करत होती स्वतःचाच तिरस्कार, म्हणाली…

Subscribe

‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने लोकांना वेड लावणारी अभिनेत्री विद्या बालनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. विद्या बालन म्हणाली, एक वेळ असा होता जेव्हा मी माझ्याच शरीराचा तिरस्कार करायला सुरुवात केली होती. विद्या सांगते की, एका वेळी तिचे वाढलेले वजन हा ‘राष्ट्रीय मुद्दा’ बनला होता, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ होती. तिने असेही सांगितले की, चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मी चित्रपटसृष्टीत आली आहे, म्हणून या गोष्टींबद्दल तिला मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. विद्याने असेही सांगितले की तिला हार्मोनल प्रॉब्लेम आहे ज्यामुळे तिचे वजन अधिक वाढले. यामुळे एकेकाळी विद्या बालन स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करू लागली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

- Advertisement -

बॉडी शेमिंगच्या मुद्यावर बोलताना विद्या बालन म्हणाली, “मी स्वतःवर प्रेम करायला लागली.” लोकांनी मला स्वीकारण्यास सुरूवात केली. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि माझी स्तुती करणे सुरू केले. कालांतराने, मी हे कबूल केले की माझे शरीरच मला जिवंत ठेवते. मात्र आज असे नाही. विद्या असेही सांगते, “काळाच्या ओघात मला हे समजलं की तेच माझे शरीर आहे म्हणूनच आज मी जिवंत आहे. ज्या दिवशी शरीराने कार्य करणं थांबवले, तर मी त्या दिवशी दिसणार नाही. मी माझ्या शरीराबाबत खूप कृतज्ञ आहे ‘. विद्याच्या मते, आता तिला केसांची लांबी, तिच्या हाताची जाडी आणि उंची कमी किंवा जास्त याची देखील पर्वा नाही कारण ती आता या सर्व गोष्टींपेक्षा तिची समाजातील उंची अधिक झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

- Advertisement -

विद्या बालनचा हा प्रवास आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवतो. लठ्ठपणामुळे स्वत: ला दुबळे समजणारे लोक किंवा त्यांना वाटते की लठ्ठपणामुळे लोक आपल्याकडे वाईट नजरेने पाहतात, असे मुळीच नाही. तुम्हीही आपल्या शरीरावर विद्याबालन सारखे प्रेम केले पाहिजे. हे समजले पाहिजे की देवाने आपल्याला दिलेलं शरीर, पुन्हा मिळू शकत नाही. होय, आपण निश्चितपणे आपल्या शरीरास तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. आपल्या शरीराचा नेहमीच विचार करा. कारण आपल्याबरोबर नेहमीच शरीरच आपले सर्वस्व असते.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -