घरताज्या घडामोडीगौतम हिरण यांच्या खुन्यांना अटक न झाल्याने व्यापारी वर्गात रोष; बुधवारी भाजप अल्पसंख्याक...

गौतम हिरण यांच्या खुन्यांना अटक न झाल्याने व्यापारी वर्गात रोष; बुधवारी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे आंदोलन

Subscribe

गौतम हिरण यांचे १ मार्च रोजी अपहरण होऊन निर्घृण हत्या करण्यात आली.

बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे १ मार्च रोजी अपहरण होऊन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह ६ दिवसांनी सापडला. पोलीसांच्या निष्क्रियतेमुळेच हा बळी गेल्याची महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग व समाजाची भावना आहे. या अपहरण आणि खुनात आरोपींना अटक करण्यासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख व भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जैन समाज प्रमुख संदीप भंडारी यांनी दिली. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी आणि सकल जैन समाज महाराष्ट्र यांनीही या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

व्यापारी गौतम हिरण यांचे १ मार्चला अपहरण झाल्यापासून भाजप अल्पसंख्याक मोर्चाने राज्य सरकारकडे याचा तपास करण्याची आग्रही मागणी केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना याविषयी हस्तक्षेप करण्यास सांगितले होते. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याप्रश्नी आवाज उठवला होता. मात्र, या प्रकरणाचा पोलीस खात्याकडून वेळीच योग्य तपास न झाल्याने ७ मार्च रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह बेलापूरपासून अवघ्या दहा किलोमीटरवर सापडला. परंतु, गेल्या आठवडाभरापासून तपास करत असलेल्या पोलिस यंत्रणेला या प्रकरणाचा छडा न लावता आल्याने व्यापारी वर्गात, समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

- Advertisement -

या अपहरणकर्त्या गुन्हेगारांना ताबडतोब शोधून त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी भाजप अल्पसंख्यक मोर्चा व जैन समाजाची राष्ट्रीय शिखर संस्था अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्यावतीने बुधवारी (१० मार्च) राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचे ललित गांधी व संदीप भंडारी यांनी जाहीर केले आहे. यावेळी संपूर्ण राज्यात व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने करण्यात येणार असून स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -