घरताज्या घडामोडीशर्लिन चोप्राने शेअर केलेला राज कुंद्रासोबतचा फोटो पाहताच नेटकऱ्यांनी शर्लिनला फटकारले

शर्लिन चोप्राने शेअर केलेला राज कुंद्रासोबतचा फोटो पाहताच नेटकऱ्यांनी शर्लिनला फटकारले

Subscribe

माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता असे म्हणत शर्लिनने हा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ( Shipla Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यानंतर गेल्या काही दिवसात अनेक खुलासे झालेत जे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राची (Sherlyn Chopra) देखील या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर शर्लिनने तिच्या सोशल मीडियावरुन राज कुंद्रासोबतचा तिचा अँपसाठीच्या पहिल्या शुटींगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता असे म्हणत शर्लिनने हा फोटो शेअर केला आहे. शर्लिनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी शर्लिनला चांगलेच ट्रोल केले आहे. (Netizens slam Sherlyn chopra after shared throwbanck photo with Raj Kundra on social media )

- Advertisement -

राज कुंद्रासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ असून नेटकऱ्यांनी शर्लिनला हा फोटो फोटोशॉप केल्याचे म्हणत चांगलेच फटकारले आहे. ‘राज कुंद्राची बाजू घेत नाही मात्र हा फोटो नीट पाहिल्यास तो एडिट करण्यात आल्याचे दिसतय’, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे तिघांच्या सावल्यात खूप फरक आहे शर्लिनने हा फोटो फोटोशॉप केला आहे, असेही म्हटले आहे. काहींनी तर फोटोवर एटिड केल्याचे पुरावे देत काही फोटो देखील शेअर केले आहेत.

‘२९मार्च २०१९ आम्स्प्राईच्या द शर्लिन चोप्रा अँपचे पहिले कॉन्टेंट शूट केले होते. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता कारण मी याआधी कधीच अशाप्रकारच्या अँपसोबत काम केले नव्हते. आशा आणि उत्साहाने भरलेला माहोल’, असे म्हणत शर्लिनने तिघांचा फोटो शेअर केला आहे. मात्र शर्लिनला हा फोटो शेअर केल्यानंतर सहानभुती मिळण्याऐवजी चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

- Advertisement -

शर्लिनने याआधीही राज कुंद्रासोबत अँपसाठी काम करण्याचा करार केल्याचा खुलासा केला होता. राज कुंद्राच्या अडचणीत सध्या अधिक वाढ होताना दिसत आहे. राज कुंद्रा सध्या मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात असून त्याच्या जामिन अर्जावर २० ऑगस्टरोजी सुनावणी होणार आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि प्रदर्शन केल्याप्रकरणी १९ जुलै रोजी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती.


हेही वाचा – राज कुंद्राचा तुरुंग प्रवास लांबला, २० ऑगस्टला होणार सुनावणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -