घरमनोरंजनBigg Boss15-तारक मेहता फेम 'सोनू' बिग बॉसच्या घरात लावणार हॉटनेसचा तडका...

Bigg Boss15-तारक मेहता फेम ‘सोनू’ बिग बॉसच्या घरात लावणार हॉटनेसचा तडका ?

Subscribe

सोशल मीडियावर दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोनही स्पर्धक लवकरच घरामध्ये हजेरी लावणार असल्याचे कळतेय.

बिग बॉस हाऊस(Bigg Boss15) म्हणजे प्रेम, भावना, फुल ऑन मसाला, ड्रामा यांचे भरभरुन सादरीकरण करणारी मनोरंजनाची एक स्पेशल थाळी असे म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपासून वूट(VOOT) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या बिग बॉस ओटीटीच्या(Bigg Boss OTT) पंधराव्या सिझनची जोरदार चर्चा सोशल मीडिया तसेच माध्यमांवर रंगत आहे. आता या घरामध्ये पुढील कोणता स्पर्धक एंण्ट्री करणार याकडे सर्व बिग बॉसच्या प्रेक्षकांचे लक्ष लागून राहीले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोनही स्पर्धक लवकरच घरामध्ये हजेरी लावणार असल्याचे कळतेय. यातील पहिलं नाव तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सोनू म्हणजेच निधी भानुशालीचे(Nidhi Bhanushali) नाव अव्वल स्थानी असल्याची माहिती समोर येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

- Advertisement -

निधीने आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आणि तारक मेहता… या मालिकेतून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली. मात्र काही वर्षे काम केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी निधीने या लोकप्रिय मालिकेतून एक्झिट घेतली. बिग बॉस 15 साठी निधीला अप्रोच केल्याचं म्हटलं जात आहे. निधी नेहमीच तिचे हटके आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. बिग बॉसच्या घरात निधीची वर्णी लागल्यास घरामध्ये बोल्डनेसचा पारा हाय होणार आहे हे नक्की.

तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय याच्या नावाची सुद्धा चर्चा रंगली आहे, रोनितने टेलिव्हिजन पासून आपल्या करीयरची सुरूवात केली. कसोटी जिंदगी की, आपकी अदालत या सारख्या अत्याधीक लोकप्रिय मालिकेत त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये देखील काही सिनेमात काम केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ronit Boseroy (@ronitboseroy)

- Advertisement -

रोनित ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक वेब सिरीजमध्ये झळकत आहे. दरम्यान आता रोनितचे नाव बिग बॉस स्पर्धकाच्या यादीत जोडले जात आहे. मात्र या वादग्रस्त घरामध्ये कोण दाखल होणार याची अधीकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये.


हे हि वाचा – दीपिका-रणवीर झाले अलिबागकर, 22, कोटीना विकत घेतली 90 गुंठे जमीन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -