घरमनोरंजनरवी शास्त्रीसोबतच्या प्रेमप्रकरणाचे वृत्त निम्रतने फेटाळले

रवी शास्त्रीसोबतच्या प्रेमप्रकरणाचे वृत्त निम्रतने फेटाळले

Subscribe

माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीसोबतच्या संबंधांवर अभिनेत्री निम्रत कौरने नाराजी दर्शवत ट्विटरच्या माध्यमातून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू रवी शास्त्री आणि बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौर यांच्यामधील प्रेमप्रकरणाच्या चर्चा सध्या सिनेसृष्टीत रंगत आहेत. दोघेही एकमेकांनी गेल्या दोन वर्षांपासून डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री निम्रत कौर हिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर मला अफवांचा काहीही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेली कलाकार निम्रत कौर आणि भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहेत. त्यावर बॉलीवूडसह क्रिकेटजगतातही दबक्या आवाजात बोलले जात आहे. अखेर यावर निम्रतने मौन सोडत नेटीझन्सना ट्विट करून उत्तर दिले आहे.

- Advertisement -

नेमक काय ट्विट केलयं निम्रत कौरने

“माझ्याबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्या गोष्टी ऐकीव आहेत. अफवा या सर्वात त्रासदायक असतात. आज मी माझ्याविषयी जे काही वाचले ते धक्कादायक आहे. खरंतर आज माझ्यासाठी नवीन दिवस आहे आणि माझ रुट कॅनेल असल्यामुळे मला खुप जास्त आईसक्रीम खायला मिळणार, याचा मला आनंद होत आहे.”

२०१५ च्या भेटीचे परिणाम 

‘स्पॉटबॉय’नुसार, २०१५ मध्ये एका कार लॉन्चिंगच्या निमित्ताने रवी शास्त्री आणि निम्रत कौर यांची भेट झाली होती. सोशल मीडियावर सोमवारी हे वृत्त वाऱ्याच्या वेगानं पसरलं त्यानंतर ट्विट करत निम्रतनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ट्विटद्वारे तिनं प्रेमप्रकरणाचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -