घरमनोरंजनमनीषा कोईरालाचा कॅन्सरसोबतचा लढा, मन हेलावणारा फोटो पोस्ट करत केलं मनोगत व्यक्त

मनीषा कोईरालाचा कॅन्सरसोबतचा लढा, मन हेलावणारा फोटो पोस्ट करत केलं मनोगत व्यक्त

Subscribe

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांचा उपचार आणि मनाची प्रबळ इच्छा शक्ती लागते. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी कॅन्सरवर याच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हरवले. प्रसिद्धी अभिनेत्री मनीषा कोईराला देखील या कॅन्सर लढ्यातील एक योद्धा होती. २०१२ मध्ये मनीषाला कॅन्सरचे निदान झाले. अमेरिकेत अनेक महिने उपचार घेत तिने आजाराशी लढा दिला, अनेक अडचणींवर मात करुन अखेर मनीषा मृत्यूच्या दाडेतून बाहेर आली.

नुकतचं ७ नोव्हेंबर म्हणजेच राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिनानिमित्त मनीषाने एक पोस्ट शेअर केली. यात मनीषाने कॅन्सरशी लढा देत असतानाचा एक मन हेलावून टाकणारा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून मनीषाला कॅन्सर आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याबरोबर रुग्णांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे.

- Advertisement -

मनीषाने शेअर केली नवी पोस्ट

मनीषा इंस्टाग्रामवर तिचा फोटो शेअर करत लिहिले की, आज राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिनानिमित्त मी कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या सर्वांना माझ्याकडून खूप प्रेम आणि या उपचारांमध्ये तुम्हाला यश मिळो ही प्रार्थना करते. मला माहित आहे की, हा प्रवास थोडा खडतर, कठीण आहे, पण तुम्ही त्यापेक्षाही खंबीर आहात. हे कायम ध्यानात ठेवा. ज्या रुग्णांनी कॅन्सरमुळे आपला जीव गमावला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे यातून बाहेर पडत आहेत त्यांना खूप प्रेम.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

- Advertisement -

मनीषा पुढे लिहिले की, या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. या गोष्टींची अनेकांना सांगायला हव्यात. यानेच अनेकांना प्रेरणा मिळेल. मी प्रत्येकाला सुंदर निरोगी आरोग्य आणि आनंद मिळो यासाठी प्रार्थना करतो.

अमेरिकेतील एका रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत असतानाचा मनीषा कोईराला हा फोटो आहे. मनीषाला २०१२ मध्ये गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. मात्र ६ महिने अमेरिकेत उपचार घेऊन ती या आजारातून बाहेर पडली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -