घरमनोरंजनpadma awards 2021: हा सन्मान अनेकांची तोंड बंद करेल, पद्मश्री पुरस्कारनंतर कंगना...

padma awards 2021: हा सन्मान अनेकांची तोंड बंद करेल, पद्मश्री पुरस्कारनंतर कंगना रनौतची प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रनौतचा सोमवारी पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने चाहत्यांसाठी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. कंगनाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना पुरस्कार मिळाल्यानंतर सांगितले की, यापूर्वी तिला एक अभिनेत्री म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र पद्मश्री पुरस्कारने देशातील एक आदर्श नागरिक म्हणून तिला कसे महत्त्व आहे हे दाखवून दिले.

या व्हिडिओमध्ये कंगना पुढे म्हणाली की, मी कृतज्ञ आहे. मी लहान वयात जेव्हा कुठे माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा कुठे मला ८-१० वर्षांनी यशाची चव चाखायला मिळाली. पण, जेव्हा मी शेवटी यशस्वी झाले तेव्हा मला त्याचा फारसा आनंद झाला नाही. मात्र मी जेव्हा फेअरनेस प्रोडक्ट, आयटम नंबर, फेमस लीड एक्टर्स आणि प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटांमध्ये काम करणे सोडले त्यावेळी मी जेवढे पैसे कमावले त्यापेक्षा जास्त शत्रू बनले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये कंगना पुढे म्हणते की, मी अनेकदा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर माझे मत मांडते आणि अजूनही माझ्यावर अनेक कायदेशीर खटले दाखल आहेत. लोक मला वारंवार विचारतात की, या सगळ्यातून तुला काय मिळते? तू हे सर्व का करतेस? हे तुझे काम नाही. मात्र अशा लोकांना हा पुरस्कारचं उत्तर आहे. मला पद्मश्रीच्या रूपाने जो सन्मान मिळाला आहे त्यामुळे अनेकांची तोंडं बंद होतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

- Advertisement -

देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री पुरस्कार कंगना राणौत व्यतिरिक्त, अदनान सामी, एकता कपूर आणि करण जोहर यांना देखील देण्यात आला आहे. त्याचवेळी, गायक एसपी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अदनान म्हणाले की, मला हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांना समर्पित करायचा आहे. त्याचवेळी चित्रपट निर्माती एकता कपूरने या सन्मानाबद्दल सर्वांचे आभार मानले आणि आपला पुरस्कार तिची आई शोभा आणि वडील जितेंद्र यांना समर्पित केला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -