घरताज्या घडामोडीलोकांच्या व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीनेच केली चूक, ट्रोल होताच ट्विट डिलीट

लोकांच्या व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीनेच केली चूक, ट्रोल होताच ट्विट डिलीट

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट करत टोमणे देखील मारले. मात्र इतरांना व्याकरणाच्या चुका दाखवणाऱ्या सोनालीने मात्र तिच्या ट्विटमध्ये चांगल्याच चुका केल्या होत्या.

Sonalee Kulkarni :  राज्यात काल म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिवस साजरा झाला. राज्यात दरवर्षी या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. राजकारण्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट करत टोमणे देखील मारले. मात्र इतरांना व्याकरणाच्या चुका दाखवणाऱ्या सोनालीने मात्र तिच्या ट्विटमध्ये चांगल्याच चुका केल्या होत्या.  व्याकरणाच्या चुकांवरुन धारेवर धरणाऱ्या सोनालीवर नेटकऱ्यांनी देखील सडकून टीका आणि मात्र त्यानंतर सोनालीने ते उपरोधिक ट्विट डिलीट केले.

काय होत सोनालीचे ट्विट ?

- Advertisement -

न आणि ण
श आणि ष
ळ आणि ड
चांदणी मधील च आणि चंद्रा मधील च
जहाजा मधील ज आणि जीवना मधील ज यांच्या उच्चारातील फरख कळणार्यांना मन:पूर्वक शुभेच्छा ! असे म्हणत सोनालीने ‘बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्च्या !!!’, असे उपरोधिक ट्विट केले.

- Advertisement -

तिने तिच्या ट्विटमधून मराठी व्याकरणाच्या चूका करणाऱ्या लोकांना टोमणा मारला होता. मात्र स्वत: सोनालीने तिच्या ट्विटमध्ये ‘कळणार्यांना’ असा चकीचा शब्द लिहिला, असे नेटकऱ्यांनी म्हटले. दुसऱ्यांच्या व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीने आधी स्व:ताचे व्याकरण पहावे विनाकारण अशी खिल्ली उडवू नये असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

सोनालीचे हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. आपण ट्रोल होतोय हे लक्षात आल्यानंतर सोनालीने त्वरित तिचे ट्विट डिलीट केला. ट्विट जरी डिलीट केले असले तरी त्याचे स्क्रिनशॉर्ट्स चांगलेच व्हायरल होत आहेत.


हेही वाचा – Urfi Javed: उर्फीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, उर्फीचा आतापर्यंतचा सर्वाधिक हॉट व्हिडीओ चर्चेत

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -