घरताज्या घडामोडीइंडियन आयडल विजेता पवनदीप राजन बनला उत्तराखंडचा ब्रॅन्डअँम्बेसेडर

इंडियन आयडल विजेता पवनदीप राजन बनला उत्तराखंडचा ब्रॅन्डअँम्बेसेडर

Subscribe

सामान्य घरातून आलेल्या मुलाने जगभरात स्वत:चे आणि राज्याचे नाव मोठे केले,असे म्हणत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी पवनदीपचा सन्मान करुन त्याला शुभेच्छा दिल्या. 

इंडियन आयडल सीजन १२चा (Indian Idol 12) विजेता पवनदीप राजनला (Pawandeep Rajan) उत्तराखंडचा ब्रॅन्डअँम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. ((Indian idol winner pawandeep rajan become brand ambassador of uttarakhand) )  उत्तरखंडच्या कला,पर्यटन आणि संस्कृतीसाठी पवनदीप नेतृत्व करणार आहे. सामान्य घरातून आलेल्या मुलाने जगभरात स्वत:चे आणि राज्याचे नाव मोठे केले,असे म्हणत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी पवनदीपचा सन्मान करुन त्याला शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

पवनदीप राजनने स्वतंत्र्यदिना दिवशी प्रसिद्ध इंडियन आयडलच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावले. पवनदीपला बक्षीस म्हणून २५ लाख रुपयांचा इनाम देण्यात आला. इंडियन आयडलच्या मंजावर पवनदीपने आपल्या आवाजाने संपूर्ण देशाला प्रेमात पाडले. हिमेश रेशमिया देखील पवनदीपचा मोठा फॅन असल्याचे त्याने सांगितले. पवनदीपच्या आवाजात एक वेगळी ताकद आणि वेगळेपण असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पवनदीप इंडियन आयडलची ट्रॉफी घेऊन उत्तराखंडमध्ये आल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी त्याचे जंगी स्वागत केले. पवनदीपला त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्याचे भरपूर कौतुक केले. यावेळी पवनदीपने त्याची काही आवडती गाणी मुख्यमंत्र्यांसमोर सादर देखील केली. मुख्यमंत्र्यांनी पवनदीपचे मनभरुन कौतुक करुन त्याला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत उत्तरखंडच्या कला,पर्यटन आणि संस्कृतीमध्ये पवनदीपला उत्तराखंडचा ब्रॅडअँम्बेसेडर म्हणून घोषित केले.

इंडियन आयडिल जिंकल्यानंतर विजेता पवनदीप राजन आणि उपविजेता अरुनिता कांजीलाल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली. राज्यपालांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचे कोतुक केले.


हेही वाचा – आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर भाऊ फैजल खानचे मोठे विधान,दुसऱ्या लग्नाविषयी म्हणाला…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -