घरमनोरंजनग्लोबल स्टार प्रियांकाचा असाही फॅशन 'सेन्स'!

ग्लोबल स्टार प्रियांकाचा असाही फॅशन ‘सेन्स’!

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा यंदा ‘मेट गाला 2019’ अनोख्या अंदाजात दिसली. यावेळी तिचा अंदाज पाहून अनेक जण चकीत झाले.

यंदाही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘मेट गाला २०१९’मध्ये तिच्या चाहत्यांना अनोख्या अंदाजात बघायला मिळाली. यावेळी प्रियांकाची स्टाईल बघून अनेक जण आश्चर्यचकित झाले. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि प्रियांका चोप्राने यावेळी ही आपल्या स्टनिंग लूक्ससह ‘मेट गाला २०१९’ च्या पिंक कारपेटवर वॉक करताना दिसली. मागच्या दोन वर्षात आपल्या लूकमुळे जगभर चर्चेत आली होती.

- Advertisement -

पहिल्यावेळी ती Ralph Lauren च्या गाऊनमध्ये दिसली होती. परंतु यंदा असणाऱ्या no fashion theam मध्ये रेड कारपेटवर एकदम वेगळ्याच अंदाजात अवतरली. ज्याची कल्पना तिच्या चाहत्यांनी देखील केली नव्हती. यावेळी प्रियांकासोबत निक जोनससुद्धा दिसला.

- Advertisement -

प्रियांकाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, तिने Dior च्या कलेक्शनमधून सॉफ्ट पेस्टल कलरचा गाऊन परिधान केला होता. त्या गाऊनला बरेच कटसह पिसं लावलेले होते. तिच्या हेअर स्टाईलबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही ऐकून थक्क व्हाल. या हेअर स्टाईलमध्ये वेगळीच दिसत आहे. या थाई हाय स्लिट गाऊनवर पिंक आणि येलो फेदर लागलेले होते. या गाऊनमध्ये प्रियांका कमालीची सुंदर दिसत होती. पण  या गाऊनसोबत प्रियांकाने कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक आगळा-वेगळा क्राऊनही चढवला.

 

View this post on Instagram

 

The best dressed couple and that kissss ??

A post shared by Priyanka Chopra Fans zone (@priyanka_chopra_fans_zone) on

प्रियांकाची हेअर स्टाईल, त्यावरचा क्राऊन हे सगळेच चर्चेचा विषय ठरले. प्रियांकाचा पती नीक जोनस पांढऱ्या रंगाच्या पॅटशर्ट सोबत महाराजा सारखी पांढरी ओढणी हातात धरली होती. या लूकमध्ये त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

 

View this post on Instagram

 

The best Dressed at the Metgala . ????

A post shared by Priyanka Chopra Fans zone (@priyanka_chopra_fans_zone) on

प्रियांकाचा हा लूक काहीवेळातच व्हायरल झाला. काहींना प्रियांकाचा हा लूक आवडला पण अनेक जण प्रियांकाचा हा अवतार पाहून थक्क झालेत. अनेकांनी प्रियांकाचा लूक पाहून खिल्ली उडवून तिचा हा लूक व्हायरल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -