घरमनोरंजनफोटो स्टुडिओ आता अमेरिकेत

फोटो स्टुडिओ आता अमेरिकेत

Subscribe

शीर्षक वाचून पडलात ना गोंधळात. अमेरिकेत ऑलरेडी अनेक नामवंतांचे फोटो स्टुडिओ असताना आता हा कुठला नवीन फोटो स्टुडिओ, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण उत्तर अगदी सोप्प आहे. अभिनेते सुनिल बर्वे यांनी आपल्या सुबक नाट्यसंस्थेच्यावतीने ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हे नाटक आवडलेले आहे. जे नाटक मुंबईत गाजते त्या नाटकाला अमेरिकेत बोलावणे येते. पुढच्या काही दिवसांत ‘अमर’ ची टीम अमेरिकेला रवाना होणार आहे. एक महिन्याच्या वास्तव्यात सात-आठ प्रयोग केले जाणार आहेत.

सुनिल बर्वेने मध्यंतरी काही जुन्या नाटकांची निर्मिती करून ठरावीक प्रयोगात ती नाटके प्रेक्षकांना पहाता येईल अशी सोय केली होती. त्या नाटकांना इतका प्रतिसाद मिळाला की प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा काही थिएटरमध्ये प्रयोग करावे लागले होते. मराठी नाटक हे एका ठरावीक साच्यातले न राहता तांत्रिकदृष्ठ्या त्यात बदल दिसावा यासाठी काही दिग्दर्शकांना घेऊन सुनिलने परदेशवारी केली होती आणि आता त्याच्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचे अमेरिकेत प्रयोग होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -