घरक्रीडासिंधू मालामाल

सिंधू मालामाल

Subscribe

चीनच्या ली-निंग कंपनीने केला ५० कोटींचा करार

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने मागील काही वर्षांत खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या तिला आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यासाठी पुढे सरसावत आहेत. आता चीनी कंपनी ली-निंगने तिच्याशी चार वर्षे आणि ५० कोटींचा करार केला आहे. बॅडमिंटन खेळाडूने केलेला हा सर्वात महागड्या करारांपैकी एक आहे.

२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवल्यामुळे सिंधूला खरी ओळख मिळाली होती. तेव्हापासून तिने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तिची कमाईही वाढत गेली आहे. ती मागील वर्षी फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीत सातव्या स्थानी होती, तर आता ली-निंगशी केलेल्या करारामुळे तिच्या कमाईमध्ये अधिकच वाढ होणार आहे.

- Advertisement -

मागील महिन्यातच ली-निंगने भारताचा पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतसोबत चार वर्षे आणि ३५ कोटींचा करार केला होता. ली-निंग ही स्पोर्ट्स कंपनी चीन, इंडोनेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या बॅडमिंटन संघाची प्रायोजक आहे. तसेच ही कंपनी २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशियाडसाठी भारतीय संघाची प्रायोजक होती. ते भारतीय संघाचे २०२० टोकियो ऑलिम्पिकपर्यंत भारतीय संघाचे प्रायोजक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -