घरमनोरंजनऐकावं ते नवलच! Anupam Kher यांच्या घरी पोहोचले काश्मिरी पंडित अन् केली...

ऐकावं ते नवलच! Anupam Kher यांच्या घरी पोहोचले काश्मिरी पंडित अन् केली त्यांची पूजा

Subscribe

या चित्रपटाला प्रशंसाकांसोबतच काही निंदक सुद्धा लाभलेले आहेत. या चित्रपटातील कलाकारांच्या उत्तम अभिनयाचं कौतुक केल जात आहे, इतकचं नाही तर अनेक जण या चित्रपटातील कलाकारांना भेटून प्रेम व्यक्त करत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगभरात चर्चेत असलेला चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ ने सध्या बॉक्स ऑफिसवर २३४ करोडचा टप्पा पार केलेला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, या चित्रपटात काश्मिरी पंडितांचा संघर्ष दाखवलेला आहे. हा चित्रपट पाहून अनेक जण भावूक झाले तर काहींनी या चित्रपटावर खोचक टीकासुद्धा केली आहे.
त्यामुळे या चित्रपटाला प्रशंसकांसोबतच काही निंदकसुद्धा लाभलेले आहेत. या चित्रपटातील कलाकारांच्या उत्तम अभिनयाचं कौतुक केलं जात आहे, इतकंच नाही तर अनेक जण या चित्रपटातील कलाकारांना भेटून प्रेम व्यक्त करत आहेत.

असाच एक व्हिडीओ अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केला आहे.

- Advertisement -

अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन पंडित त्यांची पूजा करताना दिसत आहेत. त्यांनी खाली कॅप्शनमध्ये लिहिले की, “गेल्या काही दिवसांपासून #TheKashmirFiles रिलीज झाल्यानंतर प्रत्येक तिसऱ्या-चौथ्या दिवशी माझ्या घराखाली पंडित किंवा पुजारी येतात आणि पूजा करून काही न मागता निघून जातात. त्यांचा आशीर्वाद मिळवून मी कृतार्थ आणि कृतघ्न झालो आहे, हर हर महादेव!”

- Advertisement -

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची दुखःद संघर्षाची कथा अगदी समर्पकपणे मांडली आहे. तसेच भारतातील राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाला राजकीय वळणसुद्धा मिळालेलं आहे. या चित्रपटानंतर आता काश्मिरी पंडितांच्या हत्येचा आरोप असलेल्या बिट्टा कराटे यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीनगर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.


हेही वाचा : बॉलिवूडच्या हिरोंनाही मागे टाकेल, इतका हँडसम आहे राधे माँचा मुलगा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -