वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचंही आंदोलन

सध्या देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळं सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. आज झालेल्या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ११६.६७ रुपये आणि डिझेल १००.८९ रुपयांवर पोहोचलं आहे. वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन मुद्द्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.

सध्या देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळं सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. आज झालेल्या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ११६.६७ रुपये आणि डिझेल १००.८९ रुपयांवर पोहोचलं आहे. वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन मुद्द्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. सततच्या या वाढीला विरोध करण्याकरता काँग्रेस आजपासून ‘महागाई मुक्त भारत आंदोलन’ करत आहे. अशातच आता काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनंही विरोध केला आहे.

भाजपानं निर्माण केलेल्या महागाई विरोधात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेकडुन रस्त्यावर बसुन आंदोलन केलं जात आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ कॉंग्रेसनं आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी दिल्लीच्या विजय चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्ये आणि नेतेमंडळी जमले असताना त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी या आंदोलनात आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सामिल झाले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर जोरदार टीकाबाजी केली. त्यांनी यावेळी अशी महागाई पहिल्यांदाच झाल्याचं म्हटलं. दरम्यान, कॉंग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलन करणार आहे. आजपासुन या आंदोलनाला सुरूवात झाली असुन, संपुर्ण देशभरात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे.

‘महागाई मुक्त भारत’ या मोहिमेची सुरुवात तीन टप्प्यात धरणे आंदोलनानं केली जाणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला होता. मोदी सरकारनं लोकांना महत्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरु केल्याचे सुरजेवाला यांनी म्हटलं होतं. तर ‘राजा करे महल की तैयारी, प्रजा गरीबी महागाई की मारी’ असे म्हणत राहुल गांधींनीही इंधनाच्या वाढत्या दरांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

आजपासून राज्यभर महागाईमुक्त भारत आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. आजच्या आंदोलनानंतर २ ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर ७ एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपचा कारभार असल्याचेही ते म्हणाले.


हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी, अन्यथा उद्यापासून कठोर कारवाई होणार, अजित पवारांचा पुन्हा इशारा