घरताज्या घडामोडीबॉलिवूडच्या हिरोंनाही मागे टाकेल, इतका हँडसम आहे राधे माँचा मुलगा

बॉलिवूडच्या हिरोंनाही मागे टाकेल, इतका हँडसम आहे राधे माँचा मुलगा

Subscribe

जगभरातील कोट्यावधी लोकं राधे माँला फॉलो करतात. परंतु खूप कमी लोकांना राधे माँला एक मुलगा असल्याचे माहित आहे. राधे माँचा मुलगा काही बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये दिसला आहे. ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘आय एम बन्नी’सारख्या चित्रपटांमध्ये राधे माँच्या मुलाने काम केले आहे. राधे माँच्या मुलाचे नाव हरजिंदर सिंह आहे. लवकरच अभिनेता रणदीप हुड्डासोबत ‘इंस्पेक्टर अविनाश’ वेबसीरिजमधून पुन्हा एकदा हरजिंदर सिंह प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसीरिजमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जेव्हापासून राधे माँच्या मुलाबद्दल लोकांना समजले आहे, तेव्हापासून हरजिंदरला वेबसीरिजमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

- Advertisement -

अलीकडेच राधे माँचा मुलगा हरजिंदर सिंहने एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्याने सांगितले होते की, ‘लहानपणापासूनच क्रिकेटर किंवा अभिनेता बनण्याची आवड होती. क्रिकेटरची एक वयोमर्यादा असते हे मला माहित होते. तसेच एक काळ होता, जेव्हा अभिनयाला वय होते. परंतु आता असे काही नाही. आता तुम्ही कधीही कॅमेरासमोर येऊ शकता. फक्त तरुण भूमिका करू शकत नाही. पण नेहमी अभिनय करू शकता. मी एमआयटी पुण्यात शिकलो आहे. तिथे जे काही कार्यक्रम असायचे, त्यामध्ये मी सहभाग घ्यायचो. मग हळूहळू पुढे गेला आणि स्टेजवर शो करणे, मला आनंद देते, हे मला समजले.’

- Advertisement -

रणदीप हुड्डासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत हरजिंदर म्हणाला की, ‘रणदीप हुड्डांसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. एक अभिनेता म्हणून ते मला खूप आवडतो. मी त्यांना लखनऊच्या शूटिंगमध्ये म्हटले होते की, मी काही वेळेला त्यांच्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी गेलो आहे, नाही तर मी जात नव्हतो.; दरम्यान हरजिंदरकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. परंतु त्याबाबत हरजिंदरने काही सांगितले नाही.


हेही वाचा – Harnaaz Kaur Sandhuला ग्लॅमरस दुनियेत नव्हे तर, ‘या’ क्षेत्रात करायचंय करिअर


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -